मुंबईकरांनो पाणीपट्टी भरायची राहिली असेल तर ही बातमी वाचा; अभय योजनेविषयी महत्वपुर्ण अपडेट

समीर सुर्वे
Wednesday, 12 August 2020

कोव्हिड साथीच्या पार्श्‍वभुमीवर महानगर पालिकेने पाणी पट्टी भरण्याच्या अभय योजनेस 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे.या योजनेची मुदत 13 ऑगस्ट रोजी संपणार होती.या निर्णयामुळे मुंबईतील करदात्यांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई : कोव्हिड साथीच्या पार्श्‍वभुमीवर महानगर पालिकेने पाणीपट्टी भरण्याच्या अभय योजनेस 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या योजनेची मुदत 13 ऑगस्ट रोजी संपणार होती.या निर्णयामुळे मुंबईतील करदात्यांना दिलासा मिळाला आहे.

सावधान! मुंबई, ठाणे पालघरला हवामान खात्याने दिला मोठा इशारा; रायगड, रत्नागिरीतही अंबर अलर्ट जाहीर

महानगर पालिकेने दिलेल्या मुदतीत पाणीपट्टी न भरल्यास दर महिन्याला बिलाच्या रक्कमेवर 2 टक्के रक्कम दंड म्हणून आकारली जाते.पाणीपट्टीची वसुली करण्यासाठी काही महिन्यांसाठी बिल भरण्यास मुदतवाढ देऊन दंड रद्द केला जातो.या अभय योजनेची मुदत उद्या संपणार आहे.त्यानंतर थकित पाणीपट्टी भरल्यास करदात्यांना प्रत्येक महिन्यानुसार 2 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार होती.मात्र,महापालिकेने या योजनेला 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाकाळात रक्तदान, प्लेटलेट्स दानाला वाढता प्रतिसाद; अनेकांकडून पुढाकार

दिंडोशी येथील आमदार सुनिल प्रभु यांनी उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र पाठवून या योजनेला मुदत वाढ देण्याची मागणी केली होती.ठाकरे यांच्या सुचनेनुसार पालिकेने मुदतवाढीचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. कोव्हिड तीन महिन्याच्या काळात अनेक गृहनिर्माण संस्थांनी रहिवाशांकडून मासिक शुल्क आकारलेला नव्हता.तसेच परीस्थीती व्यावसायिक संकुलांचीही आहे.त्यामुळे आता तत्काळ त्यांना तत्काळ पाणीपट्टी भरणे शक्‍य नव्हते.तसेच,वस्त्यांमध्ये पाच घरांसाठी एक नळ जोडणी असते. कोव्हिडमुळे वस्त्यांमधील कुटूंबाची आर्थिक कुचंबणा झाली आहे.त्यांनाही तत्काळ पाणी पट्टी भरणे शक्‍य नव्हते.पालिकेच्या या निर्णयामुळे नागरीकांना दिलासा मिळाला आहे.

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If Mumbaikars want to fill the water tank, read this news; Important update about Abhay Yojana