esakal | "आम्ही ठरवलं तर भाजप रिकामा होईल, एखादा ट्रेलर लवकरच रिलीज होईल" - नवाब मालिकांचे सूचक वक्तव्य
sakal

बोलून बातमी शोधा

"आम्ही ठरवलं तर भाजप रिकामा होईल, एखादा ट्रेलर लवकरच रिलीज होईल" - नवाब मालिकांचे सूचक वक्तव्य

नवाब मलिक यांनी याबाबत एकूण तीन ट्विट केले आहे. यव ट्विटमधून मलिकांनी  भाजपाला सूचक इशारा दिलाय 

"आम्ही ठरवलं तर भाजप रिकामा होईल, एखादा ट्रेलर लवकरच रिलीज होईल" - नवाब मालिकांचे सूचक वक्तव्य

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : नुकत्याच बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका पडल्यात. बिहार निवडणुकांचे निकालही घोषित झालेत. अशात बिहारमध्ये भाजप आणि जनता दल युनायटेड लवकरच सत्ता स्थापन करतील. यंदा भाजपाची बिहारमधील कामगिरी उत्तम राहिलीये. अशात बिहारमध्ये सत्ता स्थापन करताना महाराष्ट्रातही महाविकास सरकार पडेल आणि पुन्हा भाजपाची सत्ता येईल अशी विधाने काहींकडून केली जातायत. यालाच महाविकास आघाडीतील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी रोखठोक उत्तर दिलं आहे. 

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असं तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार आहे. अशात या तीनही पक्षांमध्ये समन्वय नाही आणि एकमेकांमधील वादामुळे हे सरकार पडेल अशी काही विधाने सातत्याने समोर येतायत. यावर मलिक यांनी ट्विट करत रोखठोक उत्तर दिलं आहे. या सरकारमध्ये समन्वय योग्य आहे. कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणजेच किमान समान कार्यक्रमानुसारच हे सरकार चालत असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलंय.  

हेही वाचा हिवाळी अधिवेशनाबाबत सरकार पळ काढते आहे; प्रवीण दरेकर यांची टीका

नवाब मलिक यांनी याबाबत एकूण तीन ट्विट केले आहे, ज्यामध्ये नवाब मलिक म्हणतात, " माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि  इतर काही नेते गेल्या एक वर्षांपासून अशी विधाने करत आहेत. कारण सत्तेशिवाय त्यांना त्यांना राहता येत नाही. महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष पूर्ण करणार आहे.  कारण आमचे सरकार हे एकजुटीने किमान समान कार्यक्रमावर काम करत आहे. तिन्ही पक्षाची विचारधारा वेगळी आहे. मात्र कोणीही आपली विचारधारा सोडून सरकारमध्ये सामील झालेले नाही. जर आम्ही ठरवलं तर भाजप रिकामी होईल, पण आम्हाला असे करायचे नाही.  काही भाजप आमदारांची आमच्या पक्षात येण्याची इच्छा आहे. यामुळे एखादा ट्रेलर लवकरच रिलीज होईल. 

एकंदरच ज्याप्रकारे सध्या महाविकास आघाडी आणि ठाकरे सरकारवर भाजपकडून निशाणा साधला जातोय, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपाला सुनावत सूचक इशाराही दिलाय.  

if we decide then all BJP leaders will join NCP leader nawab malik to bjp

loading image
go to top