भिवंडीतील आयजीएम रुग्णालय हायब्रीड; एकाच वेळी कोव्हिड, नॉन कोव्हिड रुग्णांवर उपचार

शरद भसाळे
Saturday, 21 November 2020

वाढत्या कोरोना संसर्गामुळे भिवंडी शहरातील स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालय (आयीएम) "कोव्हिड-19' म्हणून घोषित करण्यात आले.

भिवंडी : वाढत्या कोरोना संसर्गामुळे भिवंडी शहरातील स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालय (आयीएम) "कोव्हिड-19' म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर येथे अनेक कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले. आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले असून या रुग्णालयात कोरोनाबाधितांबरोबरच "नॉनकोव्हिड' रुग्णांवरही उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी 100 खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा - ठाण्यातील वादग्रस्त सायकल स्टॅंडचा प्रस्ताव रद्द! सत्ताधारी शिवसेनेचा निर्णय

रुग्णालयाचे प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन मोकाशी यांनी पुढाकार घेत रुग्णालयाचा इतर उर्वरित जागेत 100 खाटांचे नॉन कोव्हिड रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू केले. सध्या नॉनकोव्हिड रुग्णालयात अपघात विभाग 10, प्रसूती विभाग 25, एसएनसीयू 15 वॉर्मर व फोटोथेरपी, पुरुष विभाग 30, स्त्री व बाल रोग विभाग 30, शस्त्रक्रिया गृह 10 अशा खाटा उपलब्ध आहेत; तर डायलिसिससाठी 5 खाटा लवकरच सुरू होत असल्याने नॉन कोव्हिड रुग्णालयात एकूण 125 खाटा सुरू झाल्याची माहिती डॉ. मोकाशी यांनी दिली. एप्रिलमध्ये हे रुग्णालय फक्त कोव्हिडमध्ये रूपांतरित करण्यात आले होते; परंतु सर्वसामान्य रुग्णांची गरज पाहून कोव्हिड व नॉनकोव्हिड अशी दोन रुग्णालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही रुग्णालयांची खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. मोकाशी यांनी दिली. 

IGM Hospital Hybrid in Bhiwandi Simultaneous treatment of covid, non-covid patients

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IGM Hospital Hybrid in Bhiwandi Simultaneous treatment of covid, non-covid patients