Breast Cancer : स्तन कर्करोगाविषयी मुंबई शहरांतही अनभिज्ञता

मुंबई शहरातील महिलाही स्तन कर्करोगाविषयी अनभिज्ञ असल्‍याचे वारंवार समोर आले आहे.
Breast Cancer
Breast Cancersakal
Summary

मुंबई शहरातील महिलाही स्तन कर्करोगाविषयी अनभिज्ञ असल्‍याचे वारंवार समोर आले आहे.

मुंबई - शहरातील महिलाही स्तन कर्करोगाविषयी अनभिज्ञ असल्‍याचे वारंवार समोर आले आहे. नुकत्‍याच झालेल्‍या स्तन कर्करोग जनजागृती मोहिमेत २० टक्के महिलांमध्ये स्तन कर्करोगाची लक्षणे आढळली आहेत. दरम्‍यान, सर्वत्र वाढणाऱ्या कर्करोगामुळे नागरिकांमध्ये जनजागृती व तपासणी करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली कामा रुग्णालयाकडून तपासणी व जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. ८ मार्च ते २७ एप्रिलदरम्यान ४३१ महिलांची स्तन तपासणी केली गेली. त्यात जवळपास २० टक्के महिलांना कर्करोगाचे निदान झाल्याचे समोर आले.

राज्यासह मुंबईत कर्करोगाचे रुग्ण वाढत आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यात महिलांना होणाऱ्या कर्करोगासाठी जागृत करण्यासाठी आणि त्याच्या तपासणीसाठी मोहीम सुरू झाली. यात सरकारी कार्यालये, बँका, न्यायालये अशा ठिकाणी शिबिरे घेतली जात असून मुंबई, पालघर, शहापूर आणि ठाणे ग्रामीण अशा विभागांत शिबिरे घेऊन स्तन कर्करोगाबाबत जनजागृतीदेखील सुरू करण्यात आली आहे.

सर्व वयोगटातील महिलांसाठी उपयुक्‍त

कर्करोग तपासणी मोहिमेत ३३ वर्षांच्या महिलेला शेवटच्या टप्प्यातील कर्करोग झाल्‍याचे समोर आले आहे. दोन वर्षांपूर्वी लग्न झाल्यानंतर काहीच दिवसांत त्‍यांना त्रास सुरू झाल्याने या महिलेने तपासणी केली असता ही बाब समोर आली. कर्करोगाची लक्षणे लवकर दिसून येत नसल्‍याने अशी प्रकरणे होत असल्‍याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्‍यामुळे कर्करोगाविषयी जनजागृती व तपासणी मोहीम सर्व वयोगटांतील मुली व महिलांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

कामा रुग्णालयात पुढील उपचार

महिलांसाठी स्तन कर्करोगाच्या जनजागृतीसह आय ब्रेस्ट स्कॅन चाचणी करण्यात आली. यात ४३१ महिलांना तपासले गेले, त्यापैकी २० टक्के महिलांना दर बुधवारी स्पेशल ओपीडीमध्ये तपासणी व उपचारांसाठी बोलावण्यात आले आहे. याचसोबत ठाणे, पालघर, शहापूर अशा ठिकाणांच्या ग्रामीण भागातही जनजागृती करण्यात येणार असून येथील रुग्णांना कामा रुग्णालयातील स्पेशालिटी क्लिनिकमध्ये बोलावण्यात येणार आहे.

कामा रुग्णालयाकडून महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या स्तन कर्करोग जनजागृती आणि उपचारांचा महिलांना फायदा होणार आहे. कर्करोग कसा ओळखावा, त्यानंतर घाबरून जाण्यापेक्षा तातडीने उपचार कसे सुरू करावेत, याबाबत माहिती होणार आहे. तसेच ठाणे, पालघरसारख्या ग्रामीण भागात जिथे मॅमोग्राफी होत नाही, अशा ठिकाणी महिलांची तपासणी आणि जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- डॉ. तुषार पालवे, अधीक्षक, कामा रुग्णालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com