esakal | कोविड प्रोजेक्टवर काम करणाऱ्या IIT-B च्या प्राध्यापिकेचं कोविडमुळेच निधन
sakal

बोलून बातमी शोधा

रिंटी बॅनर्जी

कोविड प्रोजेक्टवर काम करणाऱ्या IIT-B च्या प्राध्यापिकेचं कोविडमुळेच निधन

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: आयआयटी बॅाम्बेच्या (IIT Bombay) वरिष्ठ प्राध्यापिका रिंटी बॅनर्जी (rinti banerjee) यांचं कोविड आजारानंतर निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीमुळं गुरुवारी निधन झालं. त्या ५० वर्षांच्या होत्या. कोविडच्या संशोधनात (covid research) आणि नवनवीन उपक्रम सुरु करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्या आयआयटी बॅाम्बेच्या जैविक विज्ञान (bio science) आणि जैविक अभियांत्रिकी विभागाच्या प्राध्यापिका होत्या. (IIT-B professor involved in covid projects succumbs to virus complication)

कोविड १९ च्या संशोधनातील महत्वाच्या तीन प्रकल्पांमध्ये त्यांच मोठं योगदान आहे. रिंटी बॅनर्जी कोविड १९ साथरोगाला प्रतिबंध करणाऱ्या औषधांचंही संशोधन करत होत्या. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकाने मागच्या वर्षी पर्यावरणपूरक मास्क आणि पीपीई किट्स बनवले होते.

हेही वाचा: पूजा करताना लुंगीने पेट घेतला, BMC चे माजी आयुक्त नलिनाक्षन यांचा भाजून मृत्यू

कोविडपासून बचाव करणारे हे मास्क ड्युराप्रॅाट टेक्नोलॅाजीचा वापर करुन बनविण्यात आले आहेत. रोगजंतुनाशक आणि संसर्ग रोखण्यासाठी हे मास्क विशेष टेक्नोलॅाजीने बनवण्यात आले आहेत. अशाप्रकारच्या कोविडच्या संशोधनात रिंटी बॅनर्जी यांचं मोलाचं योगदान आहे. रिंटी सारख्या प्रतिभावंत शास्त्रज्ञाच्या निधनामुळं सर्वत्र शोककळा पसरली आहे.

हेही वाचा: आणखी एक 26/11 दहशतवादी हल्ल्या होण्याची वाट पाहताय का? भातखळकरांचा सरकारवर हल्ला

"रिंटी बॅनर्जी तरुण होत्या. त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. त्यांच्या निधनामुळं कुटुंबीय, आयआयटी बॅाम्बेसह देशाचही मोठं नुकसान झालं आहे.'' अशी दुख:द भावना आयआयटी बॅाम्बेच्या संचालक सुभासिस चौधरी यांनी व्यक्त केली आहे.

loading image