IIT Mumbai : आयआयटी विद्यार्थी आत्महत्या प्रकरणात; मुंबई पोलीसांच्या एसआयटीकडून 483 पानी आरोपपत्र दाखल IIT Mumbai student police crime sucide case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 IIT Mumbai

IIT Mumbai : आयआयटी विद्यार्थी आत्महत्या प्रकरणात; मुंबई पोलीसांच्या एसआयटीकडून 483 पानी आरोपपत्र दाखल

मुंबई - आयआयटी बॉम्बे विद्यार्थी दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने म्हणजेच एसआयटीने 483 पेक्षा जास्त पानांचे आरोपपत्र मुंबईतील न्यायालयात सोमवारी दाखल केले.

या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या एसआयटी ने इतर विद्यार्थी , आयआयटीमधील अनेकांचे जबाब नोंदवले असून त्याचाही आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे.या प्रकरणातील आरोपपत्रात एसआयटीने मुख्य आरोपी अरमान खत्री याला बनवले आहे.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपात अरमान खत्रीविरुद्ध विशेष न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.सध्या आरोपी विद्यार्थी अरमान खत्री आता जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. दर्शन सोलंकी या आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्याने यावर्षी 12 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती.

दर्शनच्या मृत्यूच्या तीन आठवड्यांनंतर, मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाला त्यांच्या खोलीतून एक सुसाईड नोट मिळाली. या नोटमध्ये "अरमानने मला मारले आहे" अशी एक ओळ लिहिलेली पोलिसाना सापडली.

तपासादरम्यान, पोलिसांना अरमान खत्रीचा दर्शन सोलंकीशी वाद झाल्याची माहिती मिळाली होती. अरमानच्या धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य दर्शनने केले होते. त्यानंतर पेपर कटरचा धाक दाखवत दर्शनला अरमानने मारण्याची धमकी दिली असल्याचे पोलीस तपासात समोर आले.