मुंबईत बेकायदा थ्री व्हिलर इलेक्‍ट्रिक बाईकची धूम, वाहन कायद्यांची सर्रास पायमल्ली

मुंबईत बेकायदा थ्री व्हिलर इलेक्‍ट्रिक बाईकची धूम, वाहन कायद्यांची सर्रास पायमल्ली
Updated on

मुंबई: मुंबईत बोरिवली, अंधेरी परिसरात बेकायदा थ्री व्हिलर इलेक्‍ट्रिक वाहनाची विक्री केली जात आहे. अद्याप केंद्रीय मोटार वाहन कायद्यांतर्गत वाहन तपासणी संस्थांनी या वाहनांना परवानगीच दिली नसून, अशी वाहने बाजारपेठेत आली कशी असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

दुचाकी, चारचाकी वाहनांच्या कंपन्यांना कुठल्याही वाहनाचे उत्पादन करायचे असल्यास त्यांना केंद्रीय मोटार वाहन कायद्यांतर्गत वाहनाचा नमुना तपासून त्याची मान्यता घेणे आवश्‍यक असते. त्याशिवाय कोणत्याही प्रकारचे वाहन बाजारपेठेत विकता येत नाही. मात्र, मुंबईत सध्या इलेक्‍ट्रिक थ्री व्हिलरने चांगलीच धूम घातली आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये या थ्री व्हिलर इलेक्‍ट्रिक वाहन विक्रेत्यांनी सर्रास दुकाने थाटली आहे. तर नागरिकांकडून सुद्धा या वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे.

मुंबईत आधीच वाहतूक कोंडी आणि बेदरकारपणे दुचाकी चालवणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामध्ये आता, बेकायदा थ्री व्हिलर इलेक्‍ट्रिक बाईकच्या वापरानंतर पुन्हा वाहतूक कोंडीमध्ये भर पडण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 
थ्री व्हिलर इलेक्‍ट्रिक बाईकच्या विक्रीनंतर आरटीओ कार्यालयाची कोणतीही परवानगी किंवा रोड टॅक्‍स भरावा लागत नसल्याने, बेकायदा असलेल्या या इलेक्‍ट्रिक वाहनांची विक्री सुद्धा वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या महसुलाचा तोटा होत असून, मोटार वाहन कायद्यांच्या नियमांचा सुद्धा भंग होत आहे.
 
दुचाकी पेक्षा इलेक्‍ट्रिक थ्री व्हिलर बाईकचे दर स्वस्त

सध्या सोशल मीडियावर या प्रकारच्या थ्री व्हिलर इलेक्‍ट्रिक बाईकची किंमत स्वस्त दिसते. 45 हजारांपासून ते 90 हजारांपर्यंतच्या ही वाहने मुंबईत अनेक ठिकाणी विक्रीला आहे. यामध्ये इलेक्‍ट्रिक चार्जिंग संपल्यानंतर साध्या सायकलप्रमाणे या बाईकला चालवता येणार आहे.

हेही वाचा- कोरोनाची लागण झालेल्या गृहमंत्र्यांना रामदास आठवलेंकडून हटके शुभेच्छा

 अशा इलेक्‍ट्रिकच्या थ्री व्हिलर बाईकला अद्याप परिवहन विभागाची परवानगी नाही. त्यामुळे अशा दुकानांवर कारवाई केली जाणार आहे.
अविनाश ढाकणे, आयुक्त, परिवहन विभाग

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Illegal sale of three wheeler electric bikes in Mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com