
डोंबिवली : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई कल्याण व डोंबिवली खाडी परिसरात कल्याण महसूल विभागाने कारवाई करत 30 लाखांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. कल्याण रेतीबंदर ते डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखान पाडा येथील खाडी परिसरात कल्याण तहसील कार्यालयातील महसूल विभागाचे पथक गुरुवारी बोटीच्या सहाय्याने गस्त घालत असताना त्यांना बेकायदा रेती उत्खनन सुरू असल्याचे आढळून आले. पथकाने त्वरित कारवाई करत खाडी पात्रात 2 बार्जेस व 4 संक्शन पंप नष्ट केले.