IMA चा एल्गार, पुढील सात दिवसात मागण्या मान्य न झाल्यास काम बंदचा इशारा  

भाग्यश्री भुवड
Tuesday, 15 September 2020

राज्यातील अडीच हजार रुग्णालये बंद होण्याच्या मार्गांवर असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेच्या प्रतिनिधींने दिली आहे

मुंबई : राज्यातील अडीच हजार रुग्णालये बंद होण्याच्या मार्गांवर असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेच्या प्रतिनिधींने दिली आहे. सरकारने खासगी छोट्या रुग्णालयांना सवलत देण्याचे कबूल केले असतानाही सरकार दर आकारणी करत असल्याच्या रोषाने आय एम ए सध्या आंदोलनाच्या तयारीत आहे. दरम्यान, सात दिवसात मागण्या मान्य न झाल्यास आता काम बंदचा इशारा आयएमए कडून देण्यात आला आहे.

सरकारने खासगी रुग्णालयावर लादलेल्या दर सक्तीमुळे लघु, मध्यम आकाराची खासगी रुग्णालये बंद होतायत. यामुळेच मध्यम आकाराची अडीच हजार रुग्णालये बंद होण्याच्या मार्गांवर असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेच्या प्रतिनिधीने दिली. सरकारने ICU दर वाढवुन देणे, जैववैद्यकीय कचरा विल्हेवाट शुल्क आणि वीज बिलामध्ये सवलत देणे असे मुद्दे कबूल केले होते. डॉक्टर वापरात असलेले पीपीई किट आणि मास्क दरात नियंत्रणातही आणण्याचे मान्य केले होते. शिवाय ऑक्सिजन दरही केंद्र सरकारच्या नियमानुसार कमी करणार असल्याचे सांगण्यात आले. 

महत्त्वाची बातमी - मुंबईकरांनो सावधान, गेल्या आठ दिवसात दिड हजार नव्या इमारतींमध्ये आढळेल कोरोना रुग्ण

सर्व पॅथीमध्ये वैद्यकीय संस्थांची बोलावलेल्या बैठकीत आयएमएला पाठिंबा दिला असून एकत्र काम करण्यासाठी संयुक्त कृती समिती स्थापन करण्यात येणार आहे. येत्या सात दिवसात सरकारने डॉक्टरांच्या मागण्या मान्य न झाल्यास सर्व डॉक्टर बेमुदत काम बंद करतील असे ठरविण्यात आले असल्याचे आय.एम.ए महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.

( संपादन - सुमित बागुल ) 

ima planning to start agitation against government policies read full news


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ima planning to start agitation against government policies read full news