गणरायाच्या आगमनाला जोरदार पर्जन्यवृष्टी; पालघर, ठाणे जिल्ह्यात अंबर अलर्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणरायाच्या आगमनाला जोरदार पर्जन्यवृष्टी; पालघर, ठाणे जिल्ह्यात अंबर अलर्ट

मुंबईत अतिवृष्टीची शक्‍यता नसली तरी पुढील तीन दिवस जोरदार पाऊस राहणार आहे.

गणरायाच्या आगमनाला जोरदार पर्जन्यवृष्टी; पालघर, ठाणे जिल्ह्यात अंबर अलर्ट

मुंबई : गणरायाचे आगमन अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले असून मुंबईसह परिसरात गणेशोत्सवाची तयारी होत आली आहे. यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येत असला तरी उत्सवाची तयारी जोमाने तयारी सुरु आहे. मात्र ठाणे, पालघर जिल्ह्यात गणेश चतुर्थीच्या दिवशी शनिवारी (ता. 22) अतिवृष्टीची शक्‍यता असून वेधशाळेने अंबर अलर्ट जाहीर केला आहे. विशेष म्हणजे या दोन जिल्ह्यातील काही भागात 204 मि.मी पर्यत पाऊस होण्याची शक्‍यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात शनिवारपर्यंत अंबर अलर्ट असून या जिल्ह्यातील काही भागात पुढील तीन दिवस 204 मि.मी पावसाची शक्‍यता आहे. त्यामुळे नाविक दल, तटरक्षक दल तसेच स्थानिक प्रशासनाला सज्जतेच्या सूचना देण्यता आल्या आहेत. 

महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेची मुदत वाढली; आरोग्य विभागाने घेतलेल्या निर्णयाविषयी जाणून घ्या

मुंबईत अतिवृष्टीची शक्‍यता नसली तरी पुढील तीन दिवस जोरदार पाऊस राहणार आहे. मुंबईत आज अधून-मधून तुरळक सरी कोसळत होत्या. पावसाचा जोर कमी असल्याने दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा बसत होत्या. मालाड येथे सर्वाधिक 31.2 मि.मी आणि बोरीवली येथे 25.4 मि.मी पावसाची नोंद झाली. पूर्व उपनगरे आणि शहर विभागात किरकोळ पाऊस झाला. मात्र, गुरुवारपासून पुन्हा पावसाचा पुन्हा जोर वाढण्याचा अंदाज आहे. 

CBI सर्वात आधी 'या' गोष्टी घेणार स्वतःच्या ताब्यात, आजच किंवा उद्या CBI ची टीम मुंबईत होणार दाखल

पुढील तीन दिवस मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. गुरुवार आणि शुक्रवारी ठाणे, पालघर मध्येही जोरदार पाऊस राहाणार आहे. मात्र शनिवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता असून या जिल्ह्यातील काही भागात 204 मिमी पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात रविवारपर्यंत अतिवृष्टीची शक्यता आहे. या जिल्ह्यांसाठी रविवारपर्यंत अंबर अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदूर्ग जिल्ह्यात शनिवारपर्यंत अंबर अलर्ट आहे. 
---
संपादन : ऋषिराज तायडे

loading image
go to top