CBI सर्वात आधी 'या' गोष्टी घेणार स्वतःच्या ताब्यात, आजच किंवा उद्या CBI ची टीम मुंबईत होणार दाखल

सुमित बागुल
Wednesday, 19 August 2020

बिहारमध्ये घटना घडली नसतानाही बिहारमध्ये गुन्हा नोंदवून तो सीबीआयकडे वर्ग करण्याचा निर्णय न्यायालयाने विशेषाधिकार वापरून घेतला आहे. 

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने CBI कडे सुपुर्द केलाय. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने महाराष्ट्र सरकारला मोठा झटका तर बिहार सरकारला दिलासा मिळाला आहे. बिहार सरकार सीबीआय तपासाची मागणी करू शकते, असेही न्या. ऋषीकेश रौय यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांनी सीबीआयला पूर्ण सहकार्य करावे, असेही आदेश न्यायालयाने दिले. या संबंधीत सर्व पुरावेही सीबीआयला देण्याचे आदेश दिले.

न्यायालयाने विशेषाधिकार वापरून हा निर्णय दिला असल्याचेही स्पष्ट केले आहे. बिहारमध्ये घटना घडली नसतानाही बिहारमध्ये गुन्हा नोंदवून तो सीबीआयकडे वर्ग करण्याचा निर्णय न्यायालयाने विशेषाधिकार वापरून घेतला आहे. 

मोठी बातमी पार्थ पवारांच्या 'सत्यमेव जयते' ट्विटवर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणतात पार्थ यांनी....

उद्याच CBI चं पथक मुंबईत येणार ?

आता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास CBI करणार असल्याने आज रात्री किंवा उद्या CBI च्या वरिष्ट अधिकाऱ्यांची एक टीम मुंबईत दाखल होणार आहे. विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती समोर येतेय. CBI चे तपास अधिकारी सुशांतच्या घरी जाऊन तपासणी करणार असल्याचीही माहिती आहे. या प्रकरणी CBI ची दिल्लीची टीम मुंबईतील CBI टीमच्या संपर्कात आहे. त्यामुळे CBI च्या मुंबईतील टीमने मुंबई पोलिसांशी संबंधित संवाद साधण्याच्या सूचना मुंबईतील CBI टीमला दिल्या गेल्याचं समजतंय.

मोठी बातमी सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मुंबईत घडामोडींचा वेग, गृहविभागात घडतायत 'या' घटना

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी CBI सर्वात आधी केस डायरी आणि शवविच्छेदनाचा अहवाल मुंबई पोलिसांकडून घेणार असल्याचं समजतंय. खरंतर आज CBI ची एक टीम मुंबईत दाखल होणार होती. मात्र आता समोर येणाऱ्या माहितीनुसार CBI ची टीम आज रात्री किंवा उद्या मुंबईत येणार असल्याचं समजतंय. या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील CBI ऑफिसमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अँटीजेन चाचण्या करण्यात येणार आहेत. दिल्लीतून येणाऱ्या अधिकाऱ्यांचाही चाचण्या केल्या जातील किंवा ते कोरोना चाचणी करूनच येण्याचीही शक्यता आहे. दिल्लीतून येणाऱ्या CBI च्या तीन अधिकाऱ्यांमध्ये एका महिला अधिकाऱ्याचाही समावेश असल्याची माहिती समोर येतेय. त्यामुळे उद्या सुशांतच्या घरी रिक्रिएशन करून CBI तपासाची सुरवात करू शकते.   

sushant singh rajput case team of three cbi officers will come to mumbai case diary and postmortem will be taken


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput case team of three cbi officers will come to mumbai case diary and postmortem will be taken