esakal | बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्जासंदर्भात महत्त्वाचा निर्णय

बोलून बातमी शोधा

exam

बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्जासंदर्भात महत्त्वाचा निर्णय

sakal_logo
By
संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा रद्द झाली असल्याने शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षेवर पूर्णपणे फोकस सुरू करण्यात आला आहे. या परीक्षेसाठी कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून विविध प्रकारचे निर्णय घेतले जात असून त्याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत परीक्षा अर्ज भरण्याची मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र ही मुभा देत असताना शिक्षण मंडळाकडून यासाठी अधिकचे शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारले जाणार आहे, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली. बारावीच्या मुख्य परीक्षेसाठी राज्य शिक्षण मंडळाकडून नियमित, पुर्नपरीक्षार्थी, श्रेणीसुधार योजनेतील तसेच खासगी विद्यार्थ्यांना अतिविशेष, अतिविलंब परीक्षाशुल्कासह अर्ज भरण्याची मुदत ही 22 एप्रिलपर्यंत देण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही विद्यार्थ्यांना हा अर्ज भरता आला नाही तर त्यांनी अधिक शुल्क भरून आपला अर्ज भरावा यासाठी हा निर्णय असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा: लसीकरणासाठी उतरण्याआधी मुंबईकरांनो ही बातमी वाचा

राज्यात कोरोना आणि त्यामुळे सुरू करण्यात आलेल्या कडक निर्बंध यामुळे ग्रामीण भागातील अनेक यंत्रणा बंद आहेत. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आलेल्या मुदतीत काही विद्यार्थ्यांना अर्ज भरता आला नसावा, त्यामुळे विद्यार्थ्यांनी कसलीही चिंता न करता पुढील काळात आपला परीक्षा अर्ज भरावा असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.