esakal | लसीकरणासाठी उतरण्याआधी मुंबईकरांनो ही बातमी वाचा

बोलून बातमी शोधा

corona vaccination
लसीकरणासाठी उतरण्याआधी मुंबईकरांनो ही बातमी वाचा
sakal_logo
By
मिलिंद तांबे - सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोविड प्रतिबंधक लसींचा मुंबईत उपलब्ध असलेला साठा संपत आला आहे. या कारणाने उद्या गुरुवारी मुंबईतील 73 पैकी 40 खासगी लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार नाही, तर उर्वरित 43 खासगी लसीकरण केंद्रांवरही मर्यादीत लससाठा उपलब्ध आहे. या कारणाने तेथे दुसऱ्या मात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांना प्राधान्याने व लससाठा असेपर्यंतच लस देण्यात येणार आहे.

हेही वाचा: Lockdown: आम्ही खायचं काय? या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड म्हणाले...

मुंबई: कोविड प्रतिबंधक लसींचा मुंबईत उपलब्ध असलेला साठा संपत आला आहे. या कारणाने उद्या गुरुवारी मुंबईतील 73 पैकी 40 खासगी लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार नाही, तर उर्वरित 43 खासगी लसीकरण केंद्रांवरही मर्यादीत लससाठा उपलब्ध आहे. या कारणाने तेथे दुसऱ्या मात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांना प्राधान्याने व लससाठा असेपर्यंतच लस देण्यात येणार आहे.

हेही वाचा: ठाणेकरांनो उद्या लसीकरणाला जाण्याआधी ही बातमी एकदा वाचाच

मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोविड प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत महानगरपालिका, शासन यांच्यातर्फे 63 लसीकरण केंद्रे तर खासगी रुग्णालयात 73 अशी एकूण 136 लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. मात्र, कोविड प्रतिबंध लसीचा साठा मर्यादित स्वरुपात प्राप्त होत असल्याने अधूनमधून काही केंद्रांवर लसीकरण तात्पुरते थांबवावे लागते. त्यातही दुसरी मात्रा (डोस) घेणाऱ्यांना प्राधान्य देणे क्रमप्राप्त असल्याने लसींचा प्राप्त होणारा साठा लक्षात घेवून दररोज लसीकरण मोहिमेचे नियोजन केले जात असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मुंबई महानगरपालिकेला दिनांक 25 एप्रिल 2021 पर्यंत एकूण 24 लाख 58 हजार 600 इतक्या लसी उपलब्ध झाल्या. पैकी, 24 लाख 10 हजार 860 लस उपयोगात आल्या. म्हणजेच 47 हजार 740 इतका लससाठा बुधवार पर्यंत लसीकरणानंतर संबधित केंद्रावर शिल्लक होता.