शिकाऊ डॉक्टरांच्या सेवाकाळाबाबत महत्वाचा निर्णय

doctor
doctor
Updated on

मुंबई: कोविड-19 आजारामुळे राज्यातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षेला देखील उशीर होणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये आपली सेवा देणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या सेवा आवश्यकतेनुसार उपलब्ध करून घेण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने घेतला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या सर्वच परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. राज्यातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेस उशिर होत आहे. तसेच वर्ष 2020- 21 या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम वर्षाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेवरही परिणाम झाला आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सन 2020-21 पासूनचे नवीन वर्ग सुरू होण्यासही उशीर होणार आहे. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
संचालनालयाने काढलेल्या परिपत्रकानुसार ज्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा निवासी कालावधी पूर्ण झालेला आहे, अशा उमेदवारांच्या सेवा आवश्यकतेनुसार उपलब्ध करून घेण्यात येणार आहेत. सदर सेवा उपलब्ध करून घेताना जे उमेदवार सेवा देण्यास इच्छूक आहेत, अशा कार्यक्षम उमेदवारांच्या सेवा सुरू ठेवण्यात येतील तसेच त्यांची नियमानुसार विद्यावेतन व निवासाची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे.

नवे विद्यार्थी आल्यास सेवा खंडित 
दरम्यान संबंधित विभागात वर्ष 2020-21 या शैक्षणिक वर्षा करिता नव्याने पदव्युत्तर विद्यार्थी रुजू झाल्यास सध्या सेवा देत असलेल्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांची सेवा मात्र संपुष्टात येणार आहे. 

त्यांची सेवा बंधपत्रित कालावधी!
पदव्युत्तर निवासी कालावधीनंतर जे उमेदवार त्यांची अतिरिक्त सेवा उपलब्ध करून देतील, त्या सेवेचा कालावधी हा बंधपत्रित कालावधी म्हणून ग्राह्य धरण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्याप्रमाणे निवासी कालावधी नंतर केलेल्या सेवेचे प्रमाणपत्र आपल्या स्तरावरून संबंधित उमेदवारास उपलब्ध करून देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

सद्यस्थितीत सर्वच परीक्षांचे आणि प्रवेशांचे वेळापत्रक कोलमडले आहेत. अशावेळी हा निर्णय योग्य आहे. यामुळे कोविड -19 चा सामना करण्यासाठी डॉक्टरांची सेवा देखील मिळणार आहे.
- डॉ राहुल वाघ, मुंबई अध्यक्ष, मार्ड संघटना

Important decision of the Directorate of Medical Education and Research regarding the tenure of trainee doctors

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com