esakal | एसटीच्या पासधारकांसाठी मोठी बातमी; परिवहन मंत्र्यांनी घेतला महत्वपुर्ण निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

एसटीच्या पासधारकांसाठी मोठी बातमी; परिवहन मंत्र्यांनी घेतला महत्वपुर्ण निर्णय
  • एसटीच्या पासधारकांना दिलासा;
  •  मुदतवाढ अथवा परतावा मिळणार

एसटीच्या पासधारकांसाठी मोठी बातमी; परिवहन मंत्र्यांनी घेतला महत्वपुर्ण निर्णय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवामुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या टाळेबंदीत एसटी महामंडळाची वाहतूक थांबवण्यात आली आहे. त्यामुळे मासिक, त्रैमासिक पास काढलेल्या; मात्र टाळेबंदीमुळे प्रवास करणे शक्य न झालेल्या प्रवाशांना सरकारने दिलासा दिला आहे. एसटी प्रवाशांना मासिक-त्रैमासिक पासमधील उरलेल्या दिवसांची मुदतवाढ अथवा उर्वरित रकमेचा परतावा देण्याची घोषणा परिवहन मंत्री अॅड्. अनिल परब यांनी मंगळवारी केली.

काय सांगता! नवरदेव थेट पीपीई कीट घालून बोहल्यावर, कुठे झालाय हा विवाह

एसटी बसच्या मासिक-त्रैमासिक पासधारक प्रवाशांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. प्रवाशांना पासवरील उर्वरित दिवसांची मुदवाढ किंवा परतावा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पासधारकांनाच दोन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. पासचा उपयोग नसल्यास परतावा घेता येईल किंवा आवश्यक असल्यास मुदतवाढीचा लाभ घेता येईल. त्यासाठी संबंधित प्रवाशांनी जवळच्या एसटी आगारात जाऊन आगार प्रमुखांच्या नावे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना मासिक-त्रैमासिक पासला मुदतवाढ अथवा परतावा रक्कम देण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे एसटी महामंडळातर्फे सांगण्यात आले.

loading image
go to top