मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील बैठक संपली; राज्यातील महत्वपुर्ण प्रश्नांवर झाली चर्चा

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 19 September 2020

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात आज एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली.

मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात आज एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली.ही बैठक मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच 'वर्षा' येथे पार पडली. या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये तब्बल पाऊण तास म्हणजेच ४५ मिनिटं बैठक सुरु होती. 

मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत यापुढील भूमिका, राज्यातील आंदोलने, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाविषयी पुढील वाटचाल, राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या इत्यांदी विषयांवर चर्चा झाली असल्याची माहिती मिळतेय.

तब्बल 45 मिनिटे चाललेल्या या बैठकीनंतर शरद पवार 'वर्षा'वरून निघाले. त्यांच्यानंतर 'वर्षा'वर मंत्री अदित्य ठाकरे आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्री येऊन पुढील चर्चा करणार असल्याचे समजते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An important meeting between Chief Minister Uddhav Thackeray and NCP President Sharad Pawar came to an end