सिडको गृहधारकांसाठी महत्वाची बातमी! कागदपत्रांची पडताळणी होणार ऑनलाईन... अधिक माहितीसाठी वाचा

सुजित गायकवाड - सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 July 2020

  • सिडको गृहप्रकल्पाच्या सूनावण्या ऑनलाईन पार पडणार 
  • टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर सिडकोकडून ग्राहकांना दिलासा

 

नवी मुंबई : राज्यभरात कोव्हीड-19च्या धर्तीवर लागू असलेल्या टाळेबंदीमूळे सिडकोच्या गृहप्रकल्पातील ग्राहकांच्या सुनावण्या ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा सिडकोने निर्णय घेतला आहे. सुनावण्यासोबतच सोडतीनंतरच्या प्रक्रिया देखील निवारा केंद्र पोर्टल मार्फत ऑनलाईन पार पडल्या जाणार आहेत. टाळेबंदीमुळे बंद असणाऱ्या सुनावण्या पुन्हा सुरू होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. 

मुंबई विद्यापीठाने घोषित केलं पदवी प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस...

सिडकोच्या विविध गृहप्रकल्पातील घरांची सोडत पार पडल्यानंतरच्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवारा केंद्रामार्फत कार्यवाही करण्यात येते. या पोर्टलद्वारे अर्ज व कागदपत्रे सादर करणे, कागदपत्रांची छाननी करणे, तक्रार प्रणाली, अर्जाची सद्यस्थितीत पाहणे ही कामे ऑनलाईनद्वारे केली जातात. टाळेबंदीच्या काळातही 6 हजार अर्जदारांची कागदपत्रे पडताळणीचे काम यशस्वीपणे करण्यात आले आहे. ऑनलाईन सुनावणी आणि अपील कशी करावी याबाबत व्हिडीओद्वारे ग्राहकांना मार्गदर्शन दिले जात आहे. पुढील टप्प्यात ग्राहकांना एसएमएस, फोन कॉल आणि ई-मेलद्वारे वेळोवेळी कळवण्यात येणार आहे.

तुम्हाला माहितीये का; टायफाईडचीही लस असते? आठ शहरांच्या सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती आली समोर

ऑनलाईन सुविधेमुळे ग्राहकांना कागदपत्रे पडताळणी आणि सुनावणीसाठी व्यक्तिगत उपस्थित राहण्याची गरज नाही. अर्जदार घर बसल्या सुनावणीसाठी ऑनलाईन उपलब्ध होऊ शकतात. या केंद्रामार्फत ऑनलाईन प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि सुरक्षित पार पडली जाणार असल्याने सिडकोच्या कार्यालयाला आणि निवारा केंद्राला भेट देण्याची गरज नाही. तसेच या पद्धतीमूळे नागरिकांची घरबसल्या वेळेची बचत होणार आहे.

--------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important news for CIDCO homeowners Documentation will be verified online ... Read for more information