मुंबई-पुणे शहरामध्ये अडकलेल्यांसाठी महत्वाचा खुलासा...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 May 2020

कृपया अर्धवट किंवा अनाधिकृत किंवा सांगोवांगी दिल्या जाणाऱ्या माहितीवर विसंबून कोणीही धावाधाव करू नये...

मुंबई :  राज्यातील मुंबई-पुणे यासारख्या  शहरांमध्ये अडकलेल्या  परप्रांतीय मजुरांसाठी विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याबाबत तयारी करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरातून दुसरीकडे जाऊ इच्छिणाऱ्या वा अशा शहरात येऊ पाहणाऱ्या  नागरिकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. मात्र राज्य सरकारकडून आता याबाबत महत्त्वाचा खुलासा करण्यत आला आहे?

पोलिस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये (उदा. औरंगाबाद, नागपूर)  आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्याचे अधिकार  संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना आहेत. 

बापरे!  ब्लॅकने विकलं जातंय कोरोनातून बरं झालेल्या रुग्णाचं रक्त?

असं असलं तरीही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रामधील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास अथवा त्या  जिल्ह्यातून या प्राधिकरण क्षेत्रात येण्यास  परवानगी नाही.

मात्र, या दोन्ही  प्राधिकरण क्षेत्रातून महाराष्ट्राबाहेर (विशेषत: मजुरांना) जाण्याच्या परवानगी आहे. अशा परवानगीसाठी जवळच्या पोलीस ठाण्यात संपूर्ण माहितीसह मेडिकल प्रमाणपत्रासह अर्ज करता येईल.

इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय; एप्रिल महिन्यात 'इतक्या' विकल्या गेल्यात गाड्या

सर्व पोलिस ठाण्यांची माहिती एकत्र करून त्या विभागांच्या पोलिस उपआयुक्तांकडे पाठविली जाईल. अर्जाची छाननी करून नियमानुसार आणि तेथील कोरोनाचा प्रादुर्भाव परिस्थितीचा विचार करून  पुढील कार्यवाही केली जाणार आहे. कृपया अर्धवट किंवा अनाधिकृत किंवा सांगोवांगी दिल्या जाणाऱ्या माहितीवर विसंबून कोणीही धावाधाव करू नये, असे असे सुचित करण्यात आले आहे.

important news for those who are stuck in mumbai or pune like migrant workers or pilgrims


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: important news for those who are stuck in mumbai or pune like migrant workers or pilgrims