ठाण्यातील गणेशविसर्जनाबाबतही आल्या महत्वपुर्ण सूचना; ठाणेकरांना बुक करावा लागेल ऑनलाईन स्लॉट

राजेश मोरे
Wednesday, 12 August 2020

गणेश विसर्जनाच्यावेळी गर्दी होवू नये यासाठी महापालिकेच्या डीजीठाणे प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन टाईमस्लॅाट बुकिंग सुविधा सुरू करण्याचा निर्णय महापालिका आुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी घेतला आहे.

ठाणे  ः गणेश विसर्जनाच्यावेळी गर्दी होवू नये यासाठी महापालिकेच्या डीजीठाणे प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन टाईमस्लॅाट बुकिंग सुविधा सुरू करण्याचा निर्णय महापालिका आुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी घेतला आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या अटी पालन करुन सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यापूर्वीच महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केले आहे.

समुद्रात मुर्ती विसर्जनाबाबत आली सर्वात मोठी बातमी; जाणून घ्या BMC ने काय दिल्या आहेत सूचना

महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेला सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत, सलोख्यात व सुरक्षित पद्धतीने साजरा करण्यासाठी महापालिका व पोलिस यंत्रणा विविध उपाययोजना करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे महानगरपालिका क्षेत्रात श्रींची मूर्ती विसर्जनासाठी डिजीठाणे प्रणालीद्वारे ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधा सुरु करण्यात येत आहे.

विसर्जनावेळी होणारी गर्दी लक्षात घेवून महापालिका क्षेत्रात यावर्षीही 13 ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती आणि एकूण 20 ठिकाणी मुर्ती स्वीकृती केंद्रांची निर्मिती करण्यात येणार आहेत. या ठिकाणी कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी गर्दी टाळण्याला प्राधान्य देऊन व भाविकांच्या सोयीसाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आता डिजीठाणे कोव्हिड-19 डॅशबोर्ड च्या संकेतस्थळावर विसर्जनाची टाइमस्लॉट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

कर्करोगावरील उपचारासाठी अभिनेता संजय दत्त अमेरिकेला जाणार

शुक्रवार चौदा ऑगस्टपासून ठाणेकरांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. www.covidthane.org या महानगरपालिकेच्या अधिकृत डिजीठाणे डॅशबोर्ड लिंकवर जाऊन Ganesh Visarjan Booking हे पर्याय निवडून आपल्या प्रभागातील कृत्रीम तलावांची किंवा मुर्ती स्वीकृती केंद्रांची यादी बघून गणेश मूर्ती विसर्जनासाठी आपल्या जवळच्या विसर्जन स्थळाचा टाइमस्लॉट बुक करून महानगरपालिकेला योग्य नियोजन करण्यास सहकार्य करावे असे आवाहन डॉ. श्री. विपिन शर्मा यांनी केले आहे.

पालघर नगर परिषद क्षेत्रात 'या' तारखेपर्यंत पुन्हा एकदा लॉकडाऊन

हाॅटस्पाॅटला घरीच विसर्जन
हॅाटस्पॅाट आणि प्रतिबंधित क्षेत्रांमधील गणपती मुर्ती विसर्जनासाठी प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर विसर्जनास परवानगी देण्यात येणार नसून नागरिकांनी घरच्या घरीच श्रीच्या मुर्तीचे विसर्जन करून कोरोना महामारीच्या काळात गणेशोत्सवामध्ये कोरोनाची संसर्ग होणार नाही यासाठी महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

-----------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important suggestions regarding Ganesha immersion in Thane; Thanekar will have to book online slots