Thane Lok Sabha: भाजपच्या ताब्यातील ठाणे १९९६ मध्ये शिवसेनेने हिसकावलं अन्..., नियतीने पुन्हा डाव साधला!

Thane Lok Sabha: भाजपच्या ताब्यात असलेला ठाणे लोकसभा मतदारसंघ १९९६ मध्ये शिवसेनेने हिसकावला. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी ही खेळी यशस्वी करून दाखवली. आता पुन्हा एकदा भाजप तिथे आपले कमळ फुलवण्याच्या प्रयत्नात आहे.
Thane Lok Sabha
Thane Lok SabhaEsakal

Thane Lok Sabha: भाजपच्या ताब्यात असलेला ठाणे लोकसभा मतदारसंघ १९९६ मध्ये शिवसेनेने हिसकावला. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी ही खेळी यशस्वी करून दाखवली. त्यांनी ज्या नकाशाच्या जोरावर त्यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघ मागितला. आज तोच डाव भाजप खेळत आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेलाच हवा, या हट्टावर ते ठाम होते. यासाठी त्याचा दांडगा अभ्यासही केला. पत्रकार मित्र, काही साथीदार आणि आनंद दिघे यांनी स्केचपेन हातात घेत कुठे कोणाच्या किती जागा आहेत, याची चाचपणी करण्यास सुरुवात केली. जिथे शिवसेना तिथे ते भगव्या रंगाने अधिकचे चिन्ह जोडत गेले. बघताबघता ठाणे जिल्ह्याचा अख्खा नकाशा भगव्या रंगाने भरला.

Thane Lok Sabha
Election on Ballot Paper: प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी मतदान यंत्राऐवजी ‘या’ ठिकाणी बॅलेट पेपरवर झाली निवडणूक; नेमकं काय घडलं?

हाच नकाशा घेऊन ते ‘मातोश्री’वर गेले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जागावाटपाची चर्चा करण्यासाठी भाजप नेते प्रमोद महाजनही हजर होते. बाळासाहेबांनी त्याच्या शैलीत हा नकाशा महाजन यांना दाखवत अक्षरशः बोलती बंद केली. ठाणे लोकसभेसाठी आनंद दिघे यांनी टाकलेला हा डाव यशस्वी ठरला आणि ठाणे शिवसेनेचे झाले.

Thane Lok Sabha
Loksabha election 2024 : पोपट सांगतोय निवडणुकीचं भविष्य! मालकाला झाली अटक; आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण तापलं

पण आता तब्बल २८ वर्षांनंतर नियतीने हाच डाव पुन्हा फिरवला आहे. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात असला, तरी या लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक आमदार भाजपचे आहेत. जिल्ह्यात नगरसेवकांपासून ते ग्रामपंचायत सदस्यांपर्यंत भाजपचे कमळ फुलले आहे. याच जोरावर मुख्यमंत्री ठाण्याचे असले, तरी ठाणे पुन्हा काबीज करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com