
- रश्मी पुराणिक
मुंबई: पुढच्यावर्षी होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची (Mumbai BMC Election) तयारी सर्वच राजकीय पक्षांनी (Political partys) सुरु केली आहे. २०२२ मध्ये होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक आदित्य ठाकरे (Aditya thackeray) यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात सुरु आहे. मुंबईतील विविध वॉर्ड मधील प्रश्न, नगरसेवकांच्या (corporators) बैठका आदित्य ठाकरे घेत आहेत. त्यामुळे 2022 मध्ये आदित्य ठाकरे मुंबई महापालिका निवडणुकीचे नेतृत्व करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
युवा सेनेचे प्रमुख असलेले आदित्य ठाकरे राज्याचे पर्यावरण आणि उपनगरचे पालकमंत्री आहेत. मुंबईतील इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित प्रकल्पांमध्ये आदित्य ठाकरे विशेष लक्ष देत आहेत. १९९७ सारखाच प्रयोग पुन्हा एकदा शिवसेना राबवू शकते. त्यावेळी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीची सूत्र विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात दिली होती.
बाळासाहेब ठाकरे त्या निवडणुकीचा चेहरा होते. पण रणनितीक आखणी उद्धव यांनीच केली होती. तसाच प्रयोग २०२२ मुंबई महापालिका निवडणुकीत होऊ शकतो. १९९७ मध्ये उद्धव ठाकरे यांनी नेतृत्व केलेल्या निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक ११० नगरसेवक निवडून आले होते. १९९७ मध्ये उद्धव ठाकरे यांनी तिकीट वाटपात ४५ नगरसेवकांची तिकीट कापली होती.
आदित्य ठाकरे 2022 निवडणुकीत विद्यमान नगरसेवकांना डच्चू देणार का? हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. आदित्य ठाकरे युवा असल्यामुळे तरुण आणि नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते. तिकीट वाटपात आदित्य ठाकरे यांना तितकं स्वातंत्र्य असणार का? याची सुद्धा चर्चा आहे. आदित्य ठाकरे इतर पक्षातील चांगल्या उमेदवारांना सेनेत खेचून आणण्यात यशस्वी होणार का? याकडे ही लक्ष असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.