'व्हिडीओ स्वतः पाहिल्यानंतर त्यांना समजेल', शर्लिनचा राज-शिल्पावर प्रहार

"जर कुंद्रा आणि शिल्पा सर्व व्हिडीओला इरोटिका म्हणत असतील. तर आधी सर्व व्हिडीओ स्वतः पाहून त्यांना समजेल. शिल्पा आणि राज खोटे बोलू नये" असे शर्लीनने सांगितले.
Shilpa Raj
Shilpa Raj

मुंबई: पॉर्न रॅकेट प्रकरणात (Porn racket case) मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अभिनेत्री शर्लिन चोप्राची (Sherlyn Chopra) शुक्रवारी तब्बल आठ तास चौकशी केली. ''26 जुलै रोजी मला माझे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी मालमत्ता समन्स मिळाले म्हणून मी पोहोचले. यावेळी माझा जबाब नोंदवण्यात आला. मी आर्मप्राईम साठी 3 व्हिडीओ शूट केले होते. हॉटशॉट साठी मी कोणताही व्हिडीओ शूट केला नाही" असे शर्लिनने सांगितले. "राज कुंद्रासोबत (raj kundra) माझी पहिली भेट 23 जून 2019 रोजी जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये झाली. राजच्या कंपनीसोबत केलेला करार देखील दाखवला. मी शिल्पा शेट्टीच्या (shilpa shetty) जेएल स्ट्रीम कंपनीसाठी 3 व्हिडिओ देखील शूट केले त्याचे पैसे अद्याप मिळाले नाही" असे शर्लिन म्हणाली.

याशिवाय तिने कुंद्रा विरोधात केलेल्या तक्रारीबद्दलही माहिती देताना मला धमकावण्यात आले आणि कुंद्रा विरोधात जुहू पोलिस स्टेशनमध्ये केलेली तक्रार परत घेण्याची धमकी देण्यात आली. माझी कारकीर्द संपवण्याची धमकी देण्यात आली. कुंद्राचे कुटुंबही उद्ध्वस्त होईल, असे सांगूनही मन वळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Shilpa Raj
जातीवाचक वादावर वंदना कटारियाची पहिली प्रतिक्रिया

"शूटिंग दरम्यान, सेटवर कुंद्राचे क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि त्याच्याशी संबंधित लोकांनी माझ्यावर दबाव टाकला जेव्हा पहिल्यांदा या प्रकरणात गुन्हा नोंदवला गेला, तेव्हा मी माझी तक्रार सायबर सेलला दिली. मी त्याचीच प्रत गुन्हे शाखेला दाखवली. त्यामुळे जे लोक म्हणत आहेत की मी हे प्रसिद्धीसाठी करत आहे, मग आधी हे संपूर्ण प्रकरण समजून घ्या"/ असेही यावेळी चोप्रा म्हणाली.

Shilpa Raj
न्यूड व्हिडिओ शूट करणाऱ्या शर्लिन चोप्राने राज कुंद्राबद्दल केला धक्कादायक खुलासा

"जर कुंद्रा आणि शिल्पा सर्व व्हिडीओला इरोटिका म्हणत असतील. तर आधी सर्व व्हिडीओ स्वतः पाहून त्यांना समजेल. पॉर्न आणि इरोटिका मध्ये खूप फरक आहे. शिल्पा आणि राज खोटे बोलू नये" असे शर्लीनने सांगितले.

राज कुंद्राच्या या पोर्न रॅकेटमध्ये अनेक मुली बळी पडल्या आहेत. पण त्यांना धमकावले जात आहे. त्यांना गुन्हे शाखेला येथून तक्रार करावी असे आवाहनही यावेळी तिने केले. तसेच आपण याप्रकरणी गुन्हे शाखेला संपूर्ण सहकार्य करत असून यापुढेही बोलवले, तर आपण उपस्थित राहून तपासाला मदत करू असे तिने स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com