esakal | कोरोना काळात मोटरमनच्या माणुसकीने सर्वांनाच जिंकलं
sakal

बोलून बातमी शोधा

मोटरमन प्रफुल्ल मकवाना

कोरोना काळात मोटरमनच्या माणुसकीने सर्वांनाच जिंकलं

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा, कुलदीप घायवट

मुंबई: पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवली लोकलमध्ये मोटरमनला (Motorman) 7 हजार 800 रुपये आणि 8 क्रेडिट आणि डेबिट कार्ड असलेले पाकिट सापडले. मोटरमन प्रफुल्ल मकवाना(prafull makwana) यांनी कोणताही स्वार्थ न बाळगता संबंधित प्रवाशाला फोन करून पाकिट दिले. मकवाना यांनी माणुसकीच्या दृष्टीकोनातून जी कृती केली, ते विसरून गेले होते. मात्र, पाकिट हरवलेले प्रवासी प्रकाश शिरोडकर यांनी मकवाना यांचे खूप आभार मानलेच. (In corona period Motorman return back pocket & valuables to commuter)

यासह त्यांनी पश्चिम रेल्वेशी पत्रव्यवहार करून संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानंतर पश्चिम रेल्वेने मकवाना यांनी दाखविलेल्या माणूसकीबद्दल सत्कार केला. मंगळवारी, (ता. 4) रोजी मोटरमन प्रफुल्ल मकवाना यांचा सत्कार करून बक्षिस म्हणून रोख 2 हजार रुपये दिले. तसेच ही घटना समाज माध्यमावर प्रसारित झाल्याने मकवाना यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला.

हेही वाचा: मुंबईतून तब्बल ७३ टक्के ई-पास अर्जांना परवानगी नाकारली कारण....

हार्बर मार्गावरील कॉटनग्रीनवरून 23 एप्रिल रोजी खार रोड येथे प्रवासी प्रकाश शिरोडकर आले. त्यानंतर त्यांनी पश्चिम रेल्वे मार्गावरून बोरीवलीला जाणारी लोकल पकडली. काही कारणासाठी त्यांनी खिशातून पाकिट काढले. तेव्हाच त्यांना फोन आला. कोरोना पॉझिटिव्ह डायलिसिस रुग्णाला बेडची आवश्यकता होती. त्यांच्याशी बोलताना गोरेगाव स्थानक आले. स्थानकावर उतरून रिक्षा पकडण्यासाठी गेले असता, पाकिट विसरल्याचे त्यांना समजले.

हेही वाचा: 'BMC ने आमचा विश्वासघात केला', निवासी डॉक्टर्सनी आज हाती घेतले फलक, उद्या...

बोरीवली लोकलमधून प्रवास करत होतो. गोरेगाव स्थानक आल्यानंतर फोन वर बोलणारी व्यक्ती घाईघाईत स्थानकावर उतरून लोकलमध्येच पाकिट विसरली. त्यानंतर त्यांच्या पाकिटातील आधार कार्डवरील संपर्क क्रमांकावर फोन करून त्यांना पाकिट दिले. कोरोना काळात प्रत्येकाची स्थिती बिकट झाली आहे. अत्यावश्यक कागदपत्रे होती. ती पुन्हा बनविणे कठिण झाले असते. माझ्याजागी कोणीही असते तरी, मी जे केले तेच केले असते.

- प्रफुल्ल मकवाना, मोटरमन, पश्चिम रेल्वे