महाराष्ट्राच्या इतिहासात भाजपाला सर्वात मोठी संधी - देवेंद्र फडणवीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis nephew Tanmay Fadanvis Corona Vaccine

महाराष्ट्राच्या इतिहासात भाजपाला सर्वात मोठी संधी - देवेंद्र फडणवीस

मुंबई: "सर्व ताकदीचे लोक भाजपात (bjp) प्रवेश करत आहेत. तीन पक्षाचं सरकार म्हणजे भाजपला विस्ताराची संधी. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही मोठी संधी आहे. भाजपच्या विरुद्ध सर्व पक्ष (all party) एक झाले, तिथे भाजप विस्तारतोय अशी परिस्थिती सर्व राज्यात दिसून येते असे राज्याचे विरोधी पक्षनेते (opposition party) देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले. (In history of maharashtra its big opportunity for bjp devendra fadnavis)

ते कृपाशंकर सिंह यांच्या पक्षप्रवेशाच्यावेळी बोलत होते. "भाजप राजकीय स्पेस व्यापून टाकतो. आमच्यासाठी राजकारण सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा स्रोत आहे. ObC च्या प्रश्नावर आमच्या 12 आमदारांचा बळी घेतला तरी आम्ही तो प्रश्न लावून धरला" असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा: कपिल पाटील यांना मंत्री बनवून ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला शह देण्याची खेळी?

"कृपाशंकर यांचा पक्ष प्रवेश म्हणजे एक विचारधारा सोडून दुसऱ्या विचारधारेमध्ये प्रवेश आहे. त्यांनी प्रामाणिकपणे काँग्रेसमध्ये काम केलं. 370 चा मुद्दा आला आणि कृपाशंकर यांची राष्ट्रभावना जागी झाली, मोदी हे काश्मीर प्रश्नावर कायमचा उपाय करत आहे हे त्यांना वाटलं. त्यांनी आम्हाला तसं पत्र पाठवलं" असं फडणवीस यांनी सांगितलं. आज त्यांनी भाजपमध्ये राष्ट्रवादाचा विचार घेऊन प्रवेश केला आहे, असे फडणवीस म्हणाले.

loading image
go to top