esakal | महाराष्ट्रात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७ लाखाच्या उंबरठ्यावर

बोलून बातमी शोधा

corona
महाराष्ट्रात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७ लाखाच्या उंबरठ्यावर
sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: राज्यातील कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना सक्रिय रुग्णांमध्ये भर पडली आहे. देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे, कडक निर्बंध लावल्यानंतरही रुग्णसंख्या कमी न झाल्याने लॉकडाउन लावण्यात आले आहे. राज्यात सक्रिय रुग्ण 7 लाखांच्या उंबरठ्यावर असून सध्या 6 लाख  95 हजार एवढे सक्रिय रुग्ण आहेत. एका महिन्यात तीन पटीने वाढ नोंदवण्यात आली आहे. तर, गेल्या महिन्याच्या रुग्ण संख्येत 4 लाख 85 हजार नव्या रुग्णांची पडली असून 6 लाख 95 हजार एवढे सक्रिय रुग्ण झाले आहेत.

21 मार्च रोजी राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 2 लाख 10 हजार 120  एवढी होती. तेच 21 एप्रिल रोजी 6 लाख 95 हजार 747 एवढी झाली. सक्रिय रुग्णांच्या संख्यावाढीने नक्कीच चिंता वाढली आहे. सक्रिय रुग्ण संख्येत महाराष्ट्र आघाडीवर असून इतर राज्यांच्या तुलनेत राज्यातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण 55 टक्के असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या रोजची नोंद 60 हजाराच्या आकडेवारीत होत असताना सक्रिय रुग्ण संख्येत दररोज 6 ते 10 हजाराने भर पडत आहे. बुधवारी राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 6,95,747 एवढी होती. तर मंगळवारी 6,83,856 सोमवारी 6,76,520 रविवारी 6,70, 388 तर शनिवारी 6,47,933 तसेच मागच्या शुक्रवार पर्यंत 6,38,034 एवढे ॲक्टिव्ह रुग्ण होते.

हेही वाचा: गर्लफ्रेंडला भेटायचय, कुठला स्टिकर वापरु?

बुधवारी 11 हजार 891 रुग्णांची भर पडली. तर,  मंगळवारी 7,336 रुग्णांची भर पडली आहे. तर सोमवारी 6 हजार 132 रुग्णांची भर पडली. रविवारी 22 हजार 455 एवढी भर पडली. तर, शनिवारी 9 हजार 899 अशी भर पडली.

राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढत असल्याचे खरे असून ही संख्या नियंत्रणात यायला अद्याप महिना लागेल. सध्या डबल म्युटंट स्ट्रेन असल्याने रुग्ण वेगाने वाढत आहेत. त्यामुळे, लोकांनी काळजी घेतली पाहिजे.  शिवाय लसीकरण हे तेवढ्या तुलनेत झालेले नाही. काळजी घेत नसल्याने ही रुग्णसंख्या वाढत आहे.

- डॉ अविनाश सुपे , सदस्य, राज्य कोरोना टास्क फोर्स

तीन महिन्यांची आकडेवारी -

21 फेब्रुवारी - 52, 956

21 मार्च  - 2 लाख 10 हजार 120

21 एप्रिल - 6 लाख95 हजार 747

एवढे नवे रुग्ण -

4 लाख 85 हजार 627 नवे सक्रिय रुग्णांची भर