esakal | गर्लफ्रेंडला भेटायचय, कुठला स्टिकर वापरु?

बोलून बातमी शोधा

love
गर्लफ्रेंडला भेटायचय, कुठला स्टिकर वापरु?
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: कोरोना व्हायरसची साथ आल्यापासून जगात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. रोजी-रोटीपासून ते व्यक्तीगत आयुष्यात अनेक फटके सहन करावे लागतातय. मित्र-मैत्रीण, जीवलगांना भेटता येत नसल्यामुळे अनेक जण नाखुष आहेत. विवाहाच्या बोहल्यावर चढणारी जोडपी, प्रेमी युगलांना विरह सहन करावा लागतोय. एकाच शहरात असूनही आपल्या आवडत्या व्यक्तीला भेटता येत नाहीय.

हेही वाचा: Mumbai Covid 19: कोविडच्या दुसऱ्या लाटेत मुंबई बेहाल

मुंबईतही कडक लॉकडाउन आजपासून सुरु होणार आहे. याआधी कडक निर्बंध लागू होते. त्यामुळे मुंबईत एका तरुणाला आपल्या गर्लफ्रेंडला भेटता आलेले नाही. त्याने सोशल मीडियावरुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिलीय. गर्लफ्रेंडला भेटण्याची इच्छा व्यक्त केलीय. अश्विन विनोद नावाच्या एका युझरने टि्वटरवरुन मुंबई पोलिसांना टॅग केलं आहे.

हेही वाचा: तु सिंगल आहेस? व्हेंटिलेटरसाठी मागितली मदत पण घडलं भलतचं

"तुमच्यासाठी हे आवश्यक आहे, हे आम्ही समजू शकतो. पण दुर्देवाने ते आमच्या अत्यावश्यक आणि इमर्जन्सी वर्गामध्ये येत नाही. दुराव्यामुळे तुम्ही मनाने अजून जवळ याल. तुम्ही आता व्यवस्थित आहात. तुम्ही आयुष्यभर एकत्र राहा, या आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. हा फक्त एक फेज आहे" असे मुंबई पोलिसांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. इंटरनेटवर ही पोस्ट व्हायरल झाली आहे. ही पोस्ट शेअर केल्यापासून हजारो लाईक मिळाले असून तासाभरात अनेकांनी रिटि्वट केले आहेत. या पोस्टचे नेटीझन्सकडून प्रचंड कौतुक सुरु आहे.