esakal | विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपाची अभिरुप विधानसभा, फडणवीसांनी मांडला प्रस्ताव
sakal

बोलून बातमी शोधा

devendra fadnavis and bjp leaders walk out from maharashtra assembly

विधिमंडळ पायऱ्यांवर भाजपाची अभिरुप विधानसभा, फडणवीसांनी मांडला प्रस्ताव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: भाजपाच्या (Bjp) १२ आमदारांचं काल वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं. या मुद्यावरुन आता राज्यभरात भाजपा आक्रमक झाली आहे. महाराष्ट्रात वगेवेगळ्या ठिकाणी भाजपाची आंदोलन (bjp protest) सुरु आहेत. विधिमंडळ परिसरातही याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर (Maharashtra assembly) भाजपाने अभिरुप विधानसभा (vidhansabha) सुरु केलीय. विधासनभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात निषेधाचा प्रस्ताव मांडला. (In maharashtra assembly area on staircase bjp started session)

"शेतकरी, मराठा समाज, ओबीसी, एमपीएसई, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील आणि या सर्व प्रश्नांवर आवाज उठवला, तर खोट्या आरोपांखाली निलंबित केलं जातं. धांदातपणे खुर्चीवरुन खोट बोलून आमदारांना निलंबित केलं जातं" असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

हेही वाचा: शेंबडे आहेत, म्हणून १२ आमदार निलंबित केले - नितेश राणे

"आज या विधानसभेत मी या सरकाराच्या निषेधार्थ प्रस्ताव मांडतोय. मी आपल्याला विनंती करतो की, या प्रस्तावावर चर्चा सुरु करावी. ज्या प्रकारे या सरकारचा कारभार चाललाय, त्यात अनेक सदस्यांना आपले म्हणणे मांडून या जुलमी, वसुली भ्रष्टाचाऱ्यांविरोधात पदार्फाश करायचाय. म्हणून मी आपणास विनंती करतो की, ज्या सदस्यांनी आपल्याकडे नाव दिली आहेत, त्या सदस्यांना प्रस्ताव मांडू द्यावा" असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरील या अभिरुप विधानसभेत भाजपाचे सर्व आमदार सहभागी झाले आहेत. आत विधानसभेमध्ये सरकारचे कामकाज सुरु आहे.

loading image