मुंबईत 330 नव्या रुग्णांची भर, तर 5 रुग्ण दगावले

असून 3386 पर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
Mumbai
MumbaiSakal
Updated on

मुंबई : मुंबईत आज 330 नवीन रुग्णांची भर पडली. बाधित रुग्णांची संख्या आज वाढली असून मंगळवारी 228 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. रुग्णांसह मृतांचा आकडा ही वाढला असून आज 5 रुग्ण दगावले. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,56,772 वर पोहोचली आहे. तर 378 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,34,590 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.आज सक्रिय रुग्णांची संख्या आणखी कमी झाली असून 3386 पर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. 

Mumbai
मुंबईत कोरोनाचे आज 228 नवे रुग्ण: तर 3 रुग्णांचा मृत्यू

आज 5 कोविड मृत्यूची नोंद झाली झाल्याने मृतांचा एकूण आकडा 16,259 वर पोचला आहे.बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.04 टक्के झाला आहे.मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 1642 दिवस झाला.आज दिवसभरात 34,442 कोविड चाचण्या झाल्या असून आतापर्यंत 1,15,48,887 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com