esakal | मुंबई: कोलगेट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने ब्रश, मुलीचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई: कोलगेट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने ब्रश, मुलीचा मृत्यू

मुंबई: कोलगेट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने ब्रश, मुलीचा मृत्यू

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: कोलगेट (colgate) समजून एका मुलीने उंदीर मारण्याच्या पेस्टने (Rat killing paste) ब्रश केले. मुंबईच्या धारावी (Mumbai dharavi area) परिसरात शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली. झोपेतून उठल्यानंतर मुलगी ब्रश (brush) करण्यासाठी गेली. ओट्यावर कोलगेटच्या शेजारी उंदीर मारण्याची पेस्ट ठेवली होती. मुलीने नजरचुकीने कोलगेट समजून उंदीर मारण्याची पेस्ट ब्रशवर घेतली व त्याने ब्रश केले.

ब्रश करताना पेस्टची चव वेगळीच लागत होती. आपण कोलगेट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने ब्रश करत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या पायाखालची जमिन सरकली. तिने तातडीने तोंड धुतले. पण तो पर्यंत उशीर झाला होता.

हेही वाचा: मुंबईकर रोहित भारताचा कर्णधार?, विराट राजीनाम्याच्या तयारीत

उंदीर मारायचं विष शरीरात सर्वत्र पसरलं होतं. ती आजारी पडली. उपचारासाठी तिला जे.जे. रुग्णालयात नेले असता, रविवारी सायंकाळी डॉक्टरांनी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी धारावी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

loading image
go to top