esakal | मुंबईत गोरेगावमध्ये लसीकरणासाठी १ किलोमीटरपर्यंत रांग

बोलून बातमी शोधा

गोरेगाव लसीकरण केंद्र
मुंबईत गोरेगावमध्ये लसीकरणासाठी १ किलोमीटरपर्यंत रांग
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरीकांमध्ये लसीकरणाबद्दल मोठ्या प्रमाणावर जागरुकता निर्माण झाली आहे. सध्याच्या घडीला लसीकरण हाच कोरोनाला रोखण्याचा एकमेव मार्ग असल्यामुळे नागरीक मोठ्या संख्येने लसीकरणासाठी विविध केंद्रांवर येत आहेत. सध्या ४५ पुढील वयोगटासाठी लसीकरण सुरु आहे. येत्या १ मे पासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरु होणार आहे. पण लसीचा पुरवठा कायम राहण्याची शाश्वती नसल्यामुळे १८ ते ४४ वयोगटासाठीचे लसीकरण महाराष्ट्र सरकारने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतलाय.

महाराष्ट्राची दिवसाला ६ लाखापर्यंत नागरीकांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे. पण सध्या लसी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीयत. त्यामुळे क्षमता असूनही दररोज लसीकरण चालू ठेवणे शक्य नाही. महाराष्ट्राला लसींचा हा साठा केंद्राकडून उपलब्ध होतोय. अनेकदा नागरीक लसीकरणासाठी केंद्रावर येतात. पण लस उपलब्ध नसल्यामुळे माघारी फिरावे लागते.

हेही वाचा: बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्जासंदर्भात महत्त्वाचा निर्णय

आज मुंबईच्या गोरेगावच्या मास्को सेंटर बाहेर लसीकरणासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली आहे. सकाळपासूनच नागरीकांनी गर्दी केल्याने १ किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत. मात्र लसीकरण हे १२ नंतर सुरू होणार आहे. गुरुवारी मुंबईतील 73 पैकी 40 खासगी लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार नाही, तर उर्वरित 43 खासगी लसीकरण केंद्रांवरही मर्यादीत लससाठा उपलब्ध आहे. या कारणाने तेथे दुसऱ्या मात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांना प्राधान्याने व लससाठा असेपर्यंतच लस देण्यात येणार आहे.