esakal | मुंबईत छोट्या मुलीवर मेडिकलच्या विद्यार्थ्याने केला बलात्कार

बोलून बातमी शोधा

rape file

माणुसकीला लाजवणारी घटना, मेडिकलच्या विद्यार्थ्याचं कृत्य

धक्कादायक! मुंबईत छोट्या मुलीवर बलात्कार
sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: मुंबईत माणुसकीला लाजवणारी घटना घडली आहे. जोगेश्वरीच्या बेहराम बाग परिसरात एका छोट्या मुलीबरोबर बलात्काराची घटना घडली. आरोपी २३ वर्षांचा असून तो वैद्यकीय शाखेचा विद्यार्थी आहे. गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. सुनील सुखराम गुप्ता असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीचे कुटुंब हे आरोपीच्या घरात भाड्याने राहते. पीडीत मुलीचे कुटुंब हे आरोपीच्या घरातील पोट माळ्यावर भाड्याने राहते. या प्रकाराने आसपासचा परिसर हादरून गेला आहे.

कधी घडली बलात्काराची घटना?

पीडीत मुलगी नेहमीप्रमाणे गुरुवारी संध्याकाळी टीव्ही पाहण्यासाठी म्हणून आरोपीच्या घरी गेली. आरोपीने तीच संधी साधून दरवाजा बंद केला व मुलीवर बलात्कार केला.

हेही वाचा: कोव्हॅक्सीनच्या दुसऱ्या डोसला उशीर झाला तर? तात्याराव लहाने म्हणतात...

कसं समजलं?

पीडित मुलगी घरी आल्यानंतर रडत होती. आईने तिला रडण्याबद्दल विचारलं, तेव्हा तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलीच्या कुटुंबीयांनी लगेच ओशिवरा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपी सुनीलला अटक केली. स्थानिक नागरीकांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

(संपादन - दीनानाथ परब)