esakal | मुंबईत पालकांचा लस चाचणीला प्रतिसाद नाही, फक्त ४ मुलांना दिली झायकोव्ह- डी लस
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

मुंबईत पालकांकडून लस चाचणीला प्रतिसाद नाही, फक्त ४ मुलांना दिली झायकोव्ह- डी लस

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत (corona third wave) सर्वाधिक संसर्ग लहान मुलांना होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ही भीती लक्षात घेऊन पालिकेने 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची प्रक्रिया वेगवान गतीने सुरू केली असून आतापर्यंत चार मुलांना झायकोव्ह- डी (zycov-d vaccine) ही कोरोना लस देण्यात आली आहे. मात्र, अजूनही या लसीकरणाच्या ट्रायलसाठी मुलांचे पालक प्रतिसाद देत नसल्याची चिंता पालिका प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. (In mumbai very low response for childrens zycov-d vaccine trial dmp82)

आतापर्यंत पालिकेच्या नायर रुग्णालयात ट्रायल सुरू झाल्यापासून 50 मुलांच्या पालकांनी विचारणा केली आहे. मात्र, या ट्रायलच्या नाव नोंदणीसाठी आणि मुलाला लस टोचून घेण्यासाठी पालक इच्‍छुक नसल्याचे एकूण चित्र आहे.  त्यामुळे, आता रुग्णालय प्रशासनाने आरोग्य कर्मचार्‍यांच्या मुलांना ट्रायलसाठी घेऊन यावे यासाठी विचारणा केली आहे.

हेही वाचा: ठाणे: "लेडीज बार तुडुंब भरून कोणाच्या आशीर्वादाने सुरू होते?"

नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, "चार मुलांचे लसीकरण झाले आहे. पालक आपल्या मुलांना घेऊन येतात. पण, नाव नोंदणी करुन घेत नाही. मुले सुदृढ असतील तर त्यांची पुढची प्रक्रिया केली जाते. पण, मुल सुदृढ जरी असली तरी नाव नोंदणी करण्यासाठी पुन्हा येत नाहीत. आता  आमच्या सगळ्या स्टाफलाही आम्ही विचारलं आहे. नाव नोंदणी करून व  तपासणी करून त्यांचे लसीकरण करण्यात येते"

हेही वाचा: गरीब आरोपी पॅरोलसाठी १ लाख कसे भरणार? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल

वॉर रूमतर्फे ही माहिती -

पालकांनी लहान मुलांना ट्रायलसाठी घेऊन यावे यासाठी वॉर रूमतर्फे माहिती आणि मार्गदर्शन केले जात आहे. शिवाय, ट्रायलसाठी पालकांचे ही समुपदेशन केले जात आहे. जेणेकरून लवकरात लवकर ट्रायल संपून पुढचा मार्ग सापडेल, असेही डॉ. भारमल यांनी सांगितले.

लस घेतलेल्या मुलांचा पाठपुरावा -

आतापर्यंत चार मुलांना नायर रुग्णालयात लस टोचण्यात आली आहे. या मुलांचा पालिकेच्या डॉक्टर्सकडून सतत पाठपुरावा केला जात आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवला तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या ट्रायलच्या चाचणीसाठी पालिकेकडून पालकांना वारंवार आवाहन केले जात असून जास्तीत जास्त मुलांनी ट्रायलमध्ये सहभागी व्हावे असे सांगण्यात येत आहे.

झायडस कॅडिला कंपनीच्या झायकोव्ह डी या कोरोना लसीची चाचणी पालिकेच्या नायर रुग्णालयात सुरु झाली आहे. ही चाचणी 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर केली जात आहे.  एकूण 50 मुलांवर या लसीची चाचणी घेण्यात येणार आहे. नायर रुग्णालयात या चाचणीसाठी नोंदणी सुरू झाली असून फक्त सुदृढ मुलांनाच लस टोचली जाणार आहे.

तीन डोस घ्यावे लागणार -

यामध्ये पहिल्या दिवशी, 28 व्या दिवशी दुसरा डोस आणि तिसरा डोस 56 दिवसांनी मुलांना दिला जाणार आहे. नावाच्या नोंदणीची प्रक्रिया झाल्यानंतर आणि ठरवलेल्या निकषांमध्ये बसणाऱ्या मुलांचाच या ट्रायलमध्ये सहभाग असेल.

loading image