
Palghar Crime News: पालघरमध्ये एका विकृत व्यक्तीने ०८ वर्षीय मुलीवर विनयभंग केल्याची घटना रविवारी (ता.२९) उघडकीस आली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी त्या व्यक्तीला चोप देत पालघर पोलिसांच्या स्वाधीन केले. किराणा दुकानदार असलेल्या या ५४ वर्षीय विकृताने मुलीला दुकानात बोलावून तिच्यासोबत आश्लिल चाळे करण्याचा प्रयत्न केला असून त्याने याआधीही असे कृत्य केल्याचे परिसरातील नागरिकांकडून सांगितले जात आहे.