esakal | पुण्यात निर्बंधांवर कोणी बोलत नाही, इथे लगेच ओरडतात - किशोरी पेडणेकर
sakal

बोलून बातमी शोधा

Mayor kishori pednekar

पुण्यात निर्बंधांवर कोणी बोलत नाही, इथे लगेच ओरडतात - किशोरी पेडणेकर

sakal_logo
By
सुमीत सावंत, मुंबई

मुंबई: "मुंबईत निर्बंध (mumbai restriction) कडक केले की, बाकीचे कडक होतात. पुण्यात (Pune) निर्बंध कडक झाले की, तिथे काही बोलणार नाही, इकडे मात्र लगेच ओरडतात" असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (kishoro pednekar) म्हणाल्या. मुंबईच्या महापौरांनी यावेळी नागपूर खंडपीठाने दिलेल्या गाईडलाईन पाळणार असल्याचं सांगितलं.

"प्रशासनाचे कर्मचारी विसर्जनासाठी येणा-या मूर्ती चौपाटीबाहेरच स्वत:कडे घेणार आणि विसर्जित करणार असल्याचे महापौरांनी सांगितले. महापालिकेची तयारी पूर्ण आहे. बाप्पांबद्दलच्या संवेदना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घेऊ" असे महापौरांनी सांगितले.

हेही वाचा: 'त्या' महिलेचा सचिन वाजे ग्राहक होता, महिन्याला देत होता ५० हजार

"गणेश विसर्जनाला मुंबईकर आले, तर निर्विघ्न विसर्जन व्हावं हाच प्रयत्न आहे. कृत्रिम तलावांची संख्या वाढवणार असल्याची महपौरांनी सांगितले. ५०० मीटरच्या अंतरावर तलाव असतील, यासाठी प्रयत्न करणार आहोत. सोसायट्यांमध्येही विसर्जनाची व्यवस्था होईल. लहान मुलांची काळजी पालकांनी घ्यायला हवी. त्यांना बाहेर पाठवू नका" असे आवाहन महापौरांनी केले.

loading image
go to top