esakal | वयाने दुप्पट असलेल्या महिलेवरील बलात्कार प्रकरण, तरुणाला जामीन मंजूर

बोलून बातमी शोधा

rape case
वयाने दुप्पट असलेल्या महिलेवरील बलात्कार प्रकरण, तरुणाला जामीन मंजूर
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: वयाने दुप्पट मोठ्या असलेल्या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या एका वीस वर्षीय युवकाला सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. घटस्फोट झालेल्या ज्येष्ठ महिलेला युवकाने फसविले हे न पटणारे आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

मुलुंडमध्ये राहणाऱ्या वीस वर्ष तरुणाने न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. पश्चिम उपनगरात राहणाऱ्या एका बेचाळीस वर्षे वयाच्या महिलेबरोबर त्याचे सन 2018 पासून प्रेमसंबंध होते. ही महिला सन 2004 पासून घटस्फोटीत असून तिला चौदा वर्षाचा एक मुलगा आहे. आरोपी तरुणाने लग्नाचे आमीष दाखवून वारंवार बलात्कार केला, तसेच तिच्याकडून पन्नास ग्रॅम सोनं आणि बाईकसाठी लोनचे पैसे उकळले असा आरोप तिने केला आहे. त्याने खोटे आधारकार्ड दाखवून घरी काझी आणून निकाह केला परंतु नंतर घरच्यांना मान्य नाही असे सांगून तिला पहिल्या पतीकडे सोडले, असे तक्रारीमध्ये आहे.

हेही वाचा: अत्यावश्यक सेवेसाठी लागू केलेला 'कलर कोड'चा निर्णय रद्द

सत्र न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला. मुलगा लग्न करण्यासाठी काझी का बोलवेल, तो विशिष्ट समाजाचा असल्यामुळे पंडित बोलवेल, यामुळे एका ज्येष्ठ महिलेने स्वतःच्या स्वार्थासाठी मुलाचा वापर केला असे सकृतदर्शनी दिसतं आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. पोलिसांनी मुलाची नीट चौकशी केली असती तर लक्षात आले असते की त्याने नुकतीच अठरा वर्षे पूर्ण केली होती, त्यामुळे त्या आधी तक्रार केली असती तर महिलेवरच पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला असता, असेही न्यायालयाने नोंदविले आहे.