esakal | अत्यावश्यक सेवेसाठी लागू केलेला 'कलर कोड'चा निर्णय रद्द

बोलून बातमी शोधा

अत्यावश्यक सेवेसाठी लागू केलेला 'कलर कोड'चा निर्णय रद्द

अत्यावश्यक सेवेसाठी लागू केलेला 'कलर कोड'चा निर्णय रद्द

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा गाजावाजा करून सुरू केलेले 'कलर कोड' नियम मागे घेण्यात आले आहे. तसेच पत्रकच मुंबई पोलिस दलातील मुख्य नियंत्रण कक्षातून काढण्यात आले आहे. हे नियम कोणत्या कारणास्तव मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला हे अद्याप कळू शकले नसले. तरी या नियमाबाबत सुरवातीपासूनच संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाले होते. विशेष म्हणजे हे स्टिकर घरातच बनवून लावण्याचे आदेश दिल्याने अनेक अत्यावश्यक सेवेत नसलेल्या वाहन चालकांनी ही आपल्या गाडीला हे स्टिकर लावल्याचे तपासादरम्यान निर्माण निदर्शनास आले.

हेही वाचा: रेमडेसिव्हीरचा काळबाजार, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

नागरिकांमध्ये असलेला संभ्रम आणि ही पद्धत पोलिसांसाठीच तापदायक बनल्याने अवघ्या सात दिवसांत कलर कोडचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांवर पिवळा कलर कोड असणार आहे. मेडिकल सेवा पुरवणाऱ्या वाहनांवर लाल कलरचा तर भाजीपाल्याच्या वाहनांवर हिरवा कलर कोड देण्यात आले होते.

सध्या जिल्हा बंदीचे नियम असल्याने पोलिसांनी पून्हा ई-पास सेवा सुरू केली आहे. त्यात ही अत्यावश्यक सेवा आणि मेडिकल एमर्जन्सी वगळता कुणालाही ईपास दिले जाणार नाही. मागच्या लाँकडाऊनमध्येही ई-पासमुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. काही ठिकाणी ई-पासचा काळाबाजार झाल्याचेही उघडकीस आले होते.