
मुंबई : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण ४,१३६ उमेदवारांपैकी तब्बल ३,५१३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. महत्त्वाचे म्हणजे डिपॉझिट जप्त होण्यात शिवसेनेच्या धनुष्यबाणाची तुतारी, राष्ट्रवादीचे घड्याळ, शिवसेनेची(ठाकरे) मशाल आणि काँग्रेसच्या हातापेक्षा बरी परिस्थिती आहे. या सर्व पक्षांच्या किमान १ ते १० उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. भाजप हा एकमेव पक्ष आहे, ज्याच्या एकाही उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झालेले नाही. मनसे, वंचित आणि रासपच्या तर ९५ टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याने, या पक्षांवर मोठी नामुष्की ओढवली आहे.