esakal | वसईत घराच्या बाथरुममध्ये घुसून महिलेची हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

crime

वसईत घराच्या बाथरुममध्ये घुसून महिलेची हत्या

sakal_logo
By
विजय गायकवाड : सकाळ वृत्तसंस्था

नालासोपारा: वसई (vasai) पूर्व राजोडी परिसरातील केळीचा पाडा याठिकाणी एका 35 वर्षीय महिलेची अज्ञात आरोपीने तिच्या घराच्या बाथरूम मध्ये गळा दाबून हत्या (women murder) केली. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना उघड झाली. माहेबुबा शेख असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. (In vasai area women murder by unknown accused)

वालीव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याबाबत अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा: मुंबईत लसीचे दोन डोस घेणाऱ्यांना सवलती मिळू शकतात - BMC

आरोपीच्या शोधासाठी स्वतंत्र पथक रवाना केले असून लवकरच आरोपीला पकडू असा आशावाद वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी व्यक्त केला आहे.

loading image