esakal | मुंबईत लसीचे दोन डोस घेणाऱ्यांना सवलती मिळू शकतात - BMC
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

मुंबईत लसीचे दोन डोस घेणाऱ्यांना सवलती मिळू शकतात - BMC

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: "मुंबईत कोरोनाची तिसरी लाट (mumbai corona third wave) सप्टेंबरमध्ये येईल हे गृहीत धरून पालिकेनं (BMC) सर्व तयारी केली आहे. ऑक्सिजन, बेडस, औषधे, डॉक्टर यांची जुळवाजुळव सुरू आहे. जुन्या जम्बो कोवीड सेंटरची (covid center) रिपेअरिंग झालेली आहे. मालाडचे नवे जम्बो कोवीड सेंटर पालिकेच्या ताब्यात आलेले आहे. इतर तीन जम्बो सेंटर महिन्याअखेरीस तयार होतील" अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (suresh kakani) यांनी दिली. (The people who took two jab of vaccine could get some more relief Mumbai bmc additional commissioner suresh kakani)

"दुस-या लाटेपेक्षा तिस-या लाटेची तीव्रता कमी असेल असा अंदाज असला, तरी आम्ही मात्र रूग्ण वाढतील हे गृहित धरून सर्व तयारी करत आहोत" असे काकाणी म्हणाले. म्युकर मायकोसिसचे प्रमाण आता कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: मुंबई शहर व उपनगरातील समूह विकास योजनेला सरकारचा बूस्टर

"मुंबईत पहिला डोस घेणा-यांची संख्या निम्म्यापेक्षा जास्त आहे. तर दुसरा डोस घेणा-यांची संख्या १५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ज्यांनी दोन डोस घेतलेले आहेत त्यांना भविष्यात काही सवलती देण्याचा विचार होवू शकतो. दुकाने, शासकिय, निमशासकीय किंवा खाजगी कार्यालयात उपस्थिती वाढविण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. याचा निर्णय आठ दिवसांत होईल. यात लोकलचा विचार करत नाहीय. कारण आजूबाजूच्या शहरांमधील स्थितीचा विचार करावा लागेल व याचा निर्णय राज्य स्तरावर होईल. एक दोन दिवसांत लससाठा उपलब्ध होईल" अशी माहिती काकणी यांनी दिली.

loading image