esakal | पालघर जिल्ह्यासह वसई-विरार पालिकेत आज विक्रमी लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

पालघर जिल्ह्यासह वसई-विरार पालिकेत आज विक्रमी लसीकरण

sakal_logo
By
संदीप पंडित

विरार : कोरोना (Corona) प्रतिबंधक लस सुरु झाल्यापासून वसई-विरार (Vasai Virar) व पालघर (Palghar) जिल्ह्याला लसीचे अगदीच नाममात्र डोस (Dose) उपलब्ध करून देण्यात येत होते, मात्र 1 सप्टेंबर (September) 2021 साठी प्रथमच पालघर (Palghar) जिल्ह्यासह वसई विरार (Vasai Virar) पालिकेला विक्रमी 64 हजार डोस (Dose) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रथमच जिल्ह्याला एव्हढया मोठ्या संख्येने लस (vaccine) मात्रा उपलब्ध झाल्याने लस केंद्रावर गोंधळ उडण्याची शक्यता गृहीत धरून त्यासाठी पोलिसांची (Police) मदत घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गुरसल यांनी केले आहे.

वसई विरार महापालिका क्षेत्रात इतर महापालिकांच्या तुलनेत खूपच कमी व धिम्यागतीने लसी करण सुरु होते. याबाबत सर्वच थरातुन नाराजी व्यक्त केली जात होती. पत्रकारांनीही लसी करणाचा मुद्दा सातत्याने लावून धरला होता.

1 सप्टेंबरला वसई विरार पालिका व जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी प्रत्येकी 29 हजार कोविडसिल्डचे मिळून 58 हजार डोस तर तीन तीन ह्जारमिळून सहा हजार कोव्हॅक्सिनचे डोस पुरविण्यात आले आहेत. विविध लस केंद्रावर डोस संख्या विभागून देण्यात आली आहे.गेल्या काही दिवसापासून वसई विरार पालिका क्षेत्रातील अनेक लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली होती परंतु आज मात्र ४८ केंद्रावर महिला,रिक्षाचालक आणि तृतीय पंथीयांसाठी लस उपलब्ध करण्यात आली आहे तर ३ केंद्रावर गर्भवती महिलांसाठी लस उपलब्ध करण्यात आली आहे.

हेही वाचा: "व्यवसायात राजकारण आणि राजकारणात व्यवसाय आणू नये"

यातही राजकारण सुरु झाले भासवून आज जवळपास सहा महिन्यांनी एवढा मोठा लसीचा साठा वसई विरार आणि पालघर जिल्ह्याला मिळाल्याने शिवसेनेने मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांचे आभार मानले आहेत . तर दुसर्या बाजूला विरोधी पक्षांनी मात्र सेनेवर टीका केली आहे आता पर्यंत सरकारने या ठिकाणी दुर्लक्ष केले आहे .

गेल्या आठवड्यात ठाणे जिल्ह्याला एक लाख ४३ हजार लसीचे डॉस देणारे राज्य शासन पालघर जिल्ह्यावर मात्र अन्याय करत असताना शासनाची पाठ कसली थोपटता असा सवाल त्यांनी केला आहे.

loading image
go to top