esakal | "व्यवसायात राजकारण आणि राजकारणात व्यवसाय आणू नये"
sakal

बोलून बातमी शोधा

"व्यवसायात राजकारण आणि राजकारणात व्यवसाय आणू नये"

आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, प्रशांत आणि सागर या दोघांनी एकत्र येऊन केलेला उपक्रम हा अतिशय कौतुकास्पद आहे.

"व्यवसायात राजकारण आणि राजकारणात व्यवसाय आणू नये"

sakal_logo
By
संदीप गाडवे

केळघर (सातारा): मराठी युवकांनी अर्थार्जनासाठी व्यवसायांना प्राधान्य द्यावे. आर्थिक उन्नती झाली तर सक्षम पर्याय मिळून युवक आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील. व्यवसाय करत त्याचा राजकारणाशी संबंध न जोडता आपल्या प्रगतीकडे लक्ष केंद्रित करून आपले उदिद्ष्ट साध्य करावे, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

हेही वाचा: सातारा शहराचे होणार गुगल मॅपिंग! नगरपालिकेची तयारी

जावळी तालुक्यातील मेढा येथे रॉयल फालुदा वर्ल्ड अँड कॅफे ला दिलेल्या भेटीवेळी बोलत होते. राष्ट्रवादी आय टि सेल चे माजी जिल्हाअध्यक्ष व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे कट्टर समर्थक सागर धनावडे व जावळी शिवसेना आय टि सेल चे प्रमुख प्रशांत जुनघरे हे दोघे जावळी तालुक्याच्या राजकारणात नेहमीच सक्रिय असतात. दोघेही सोशल मिडियावर आपापल्या पक्षाची बाजू अतिशय प्रखरतेने मांडत असतात. मात्र दोघे एकत्र येत मेढा येथे रॉयल फालुदा कॅफे हा व्यवसाय सुरू केला आहे. त्याला ग्राहकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. भविष्यात प्रवीण धनावडे आणि तुषार धनावडे यांच्या साथीने संपूर्ण राज्यभरात शाखा करण्याचा मानस प्रशांत जुनघरे यांनी बोलून दाखवला.

हेही वाचा: सातारा: जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या आवारात बिबट्या

सदर भेटीवेळी बोलत असताना आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, प्रशांत आणि सागर या दोघांनी एकत्र येऊन केलेला उपक्रम हा अतिशय कौतुकास्पद आहे. त्यांचा आदर्श घेऊन तरुणानी नुसते राजकारण करत बसण्यापेक्षा व्यवसायाकडे वळावे आणि हे करत असताना व्यवसायात राजकारण आणि राजकारणात व्यवसाय आणू नये. असं बोलत दोघांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. तेव्हा समाजसेवक ज्ञानदेव रांजणे यांनी देखील शुभेच्छा देत जास्तीत जास्त तरुणांनी व्यवसाय करावे, आवश्यक ती मदत करणार असल्याचे सांगितले. यावेळी शिवाजी गोरे, सुभाष शेलार, प्रविण धनावडे, विक्रांत धनावडे, तुषार धनावडे, साहिल धनवडे, दिनेश धनावडे यांची उपस्थिती होती.

loading image
go to top