मोदींच्या हस्ते 'एआयआयबी'च्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे उद्घाटन

Narendra modi
Narendra modi

मुंबई : एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या (एआयआयबी) तिसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी मुंबईत उद्घाटन करण्यात आले. सभेला संबोधित करताना मोदी यांनी गेल्या चार वर्षातील सरकारच्या कामगिरीचा धावता आढावा घेतला. भारत 'न्यू इंडिया' म्हणून उदयास येत असून सरकारने अनेक महत्वकांक्षी योजना सुरू केल्या आहेत. पायाभूत सेवा आणि तंत्रज्ञानला चालना देण्यासाठी 'एआयआयबी'ने गुंतवणूक करावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले. 

'एआयआयबी'मध्ये भारत दुसरा मोठा भागधारक आहे. त्यामुळे देशातील बड्या प्रकल्पांसाठी 'एआयआयबी'कडून आणखी कर्ज सहजपणे मिळेल यादृष्टीने  मोदी यांनी आपल्या भाषणात भारतीय अर्थव्यवस्थेच विकासाभिमुख चित्र मांडले. आशियातील वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून जगभरातील अनेक संस्थांनी भारताची दखल घेतली आहे. परकी गुंतवणूकदारांसाठी भारत नंदनवन ठरत आहे.

विविध क्षेत्रातील सुधारणा, उद्योगांसाठी पोषक वातावरण, व्यवसाय सुलभता यामुळे  वर्ल्ड बँकेच्या 'इज ऑफ डुइंग बिझनेस' क्रमवारीत भारताचे मानांकन 42 गुणांनी सुधारले आहे. 2022 पर्यंत प्रत्येक बेघराला घर देण्याचा सरकारची योजना आहे. गृहनिर्माण क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाला मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले. सौर ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा निर्मितीला सरकार प्रोत्साहन देत आहे. प्रत्येक खेड्याला भारत नेट मधून इंटरनेट सेवेशी जोडले जाणार आहे. वस्तू आणि सेवा कर,  भरतमाला, सागरमाला, डिजिटल पेमेंट, आयुष्यमान भारत, उमंग एप आदी उपक्रमांची पंतप्रधानांनी माहिती दिली.

भारत कृषिप्रधान देश आहे. सरकार कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाला चालना देत आहे. अन्न प्रक्रिया आणि शीतगृहे यामध्ये प्रचंड संधी आहेत. एआयआयबीने यामध्ये गुंतवणुकीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. ई मोबिलिटीबाबत भारत उत्सुक असून या टेक्नॉलॉजीला पोषक वातावरण तयार होण्यासाठी यंदा भारतात जागतिक ई मोबिलिटीबाबत परिषद भरवली जाईल अशी माहिती त्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com