
संपूर्णतः तृतीयपंथीयांकडून चालविल्या जाणाऱ्या ‘ट्रान्सफॉर्मेशन सलून’ची स्थापना करण्यात आली आहे.
Mumbai News : तृतीयपंथीकडून चालवले जाणाऱ्या पहिल्या सलूनचे मुंबईत उद्घाटन
मुंबई - संपूर्णतः तृतीयपंथीयांकडून चालविल्या जाणाऱ्या ‘ट्रान्सफॉर्मेशन सलून’ची स्थापना करण्यात आली आहे. तृतीयपंथीयाकडून चालविले जाणारे हे मुंबईतील पहिले सलॉन आहे.शनिवारी या सलूनचे उद्घाटन पार पडले. उपजीविकेच्या समान संधी निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने हे पाऊल उचलले असल्याचे ‘डॉएच्च बँक आणि ‘रोटरी क्लब ऑफ बॉम्बे’ने म्हटले आहे.या पुर्वी अंधेरीत संपूर्णतः तृतीयपंथीयांनी चालविलेला एक कॅफे सुरु केल्यानंतर मुंबईतला हा दुसरा संयुक्त उपक्रम आहे.

‘ट्रान्सफॉर्मेशन सलून’च्या स्थापनेसाठी डॉएच्च बँक आणि रोटरी क्लबने पाठबळ दिले आहे. यातील नियुक्त्या आणि प्रशिक्षणाची जबाबदारी संयुक्तपणे घेतली आहे. त्याशिवाय या संस्था सुरुवातीची व्यावसायिक जबाबदारी घेणार संस्था घेणार असून त्यानंतर हे सलून व्यावसायिक पद्धतीने ‘प्राईड बिझिनेस नेटवर्क फाऊन्डेशन’ चालविणार आहे.
रचना संसद कॉलेजच्या जवळ हे सलून आहे. या सलूनमध्ये अत्यंत उच्च प्रतीचे प्रशिक्षण घेतलेले ब्युटीशीयन कार्यरत आहे.त्यापैकी काही कर्मचारी तृतीयपंथी/एलजीबीटीक्यूए असतील. ग्राहकांना त्यातून सर्वोत्तम सेवा देण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

‘ट्रान्सफॉर्मेशन सलून’च्या माध्यमातून समाजाच्या निम्न स्तरावरील तृतीयपंथी समाजघकटाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून देत आहे. समान संधी असलेला समाज निर्माण करण्यासाठी घेतलेले हे एक छोटेसे पण महत्त्वपूर्ण असे पाउल आहे
- कौशिक शपारीया , मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉएच्च बँक
वैविध्यता, समानता आणि समावेशकता हे आमच्यासाठीचे खास असे क्षेत्र आहे आणि म्हणूनच तृतीयपंथीयांसाठीचे सलून हे एक प्रमुख साध्य आहे.
- विनीत भटनागर, अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे