esakal | 2000 ची नोट बंद तर होत नाहीये, मग 'असं' का होतंय ?
sakal

बोलून बातमी शोधा

2000 ची नोट बंद तर होत नाहीये, मग 'असं' का होतंय ?
  • काळा पैसा गोळा करणाऱ्यांनी घेतला नोटाबंदीचा धसका
  • काळ्या पैशांतील २०००च्या नोटांचं प्रमाण घटलं

2000 ची नोट बंद तर होत नाहीये, मग 'असं' का होतंय ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देशातील काळ्या पैशाला आळा  बसावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2016 मध्ये एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची घोषणा केली. नोव्हेंबर 2016 मध्ये पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीची घोषणा केली. या घोषणेची भीती तीन वर्षांनंतरही कायम आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

8 नोव्हेंबर 2016 रोजी मोदी सरकारनं पाचशे आणि एक हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. दरम्यान, आता पुन्हा एकदा सरकार 2 हजारांच्या नोटांवर बंदी आणू शकतं अशी चर्चा सुरु आहे. याचाच धसका काळा पैसा जमा करणाऱ्यांनी घेतल्याचं दिसून येतंय

आता सरकारने एक अत्यंत महत्त्वाची माहिती जारी केली आहे.  प्राप्तिकर विभागाच्या छापेमारीत सापडलेल्या नोटांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांचं प्रमाण कमी झालंय. 2017 - 2018 मध्ये प्राप्तिकराच्या छाप्यांमध्ये सापडलेल्या दोन हजारांच्या नोटांचे प्रमाण 68 टक्के होते. यावर्षी ते 43 टक्क्यांवर आलंय. सरकारकडून मिळालेल्या आकडेवारीवरुन  हे समोर आलंय. 

काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मोदी सरकारनं नोटाबंदी केली. त्यानंतर रिझर्व्ह बँकेनं 2000 च्या नोटा चलनात आणल्या होत्या. आऱबीआयकडून 2 हजारच्या नोटांवर बंदी आणणारं नसल्याचंही स्पष्टीकऱण देण्यात आलं असलं तरी काळा पैसा गोळा करणाऱ्यांनी मात्र त्याचा धसका घेतल्याचं समोर आलंय.

WebTitle : income tax department relieved impotant information related to two thousand rupees note