Mumbai : बीबीसीच्या मुंबई दिल्ली स्थित कार्यालयात आयकर विभागातर्फे सर्वेक्षण कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Income Tax

Mumbai : बीबीसीच्या मुंबई दिल्ली स्थित कार्यालयात आयकर विभागातर्फे सर्वेक्षण कारवाई

मुंबई - 2002 सालच्या गुजरात दंगलीवर आधारीत माहितीपटावरून बीबीसीविरोधात सुरु झालेला वाद पेटला असतानाच आणखी एक मोठी बातमी हाती आली आहे. मंगळवारी आयकर विभागाने बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई येथील कार्यालयाची झाडा झडती घेतली आहे.

आयकर विभागाच्या चार सदस्यीय पथकाने मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स बीकेसी येथील ब्रिटीश ब्रॉडकास्टर म्हणजेच बीबीसीच्या कार्यालय असलेल्या विंडसर इमारतीत दाखल झाले. बीबीसी कंपनीतील कर संबंधातील दस्तऐवजांची तपासणी करण्यासाठी आयकर विभागाच्या टीमने बीबीसीच्या कार्यालयात पोहोचली होती.

अधिकाऱ्यांनी आवारातील सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे ताब्यात घेतली तसेच कर्मचाऱ्यांचे मोबाइल फोन तपासले, असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई शिवाय नवी दिल्ली येथील बीबीसी कार्यालयात आयकर विभागाचे अधिकारी पोहोचले होते.

आम्ही अधिकाऱ्यांशी सहकार्य केले आहे आम्हाला आशा आहे की ही समस्या लवकरात लवकर सोडवली जाईल, असे बीबीसीच्या प्रवक्त्याने प्रतिक्रियेत म्हंटले आहे. आयकर विभागाने केलेली कारवाई "सर्वेक्षण" म्हणून असल्याचे सांगितले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात ते मुख्यमंत्री असताना गुजरा तेत 2002 साली झालेल्या दंगली संदर्भात वादग्रस्त माहितीपट बीबीसीने नुकताच काही दिवसांपूर्वी प्रसारित केला होता. भारत सरकारने दोन भागांच्या या माहितीपटाला बदनामी करण्यासाठी केलेला प्रचार भाग म्हणून सांगत भारतात बंदी घातली होती. नंतर काही आठवड्यांनंतर ही कारवाई झाल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत