मुंबईकरांची चिंता वाढली! 15 दिवसांत 17,372 रुग्णांची वाढ; रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही घटला

मिलिंद तांबे
Thursday, 3 September 2020

नियंत्रणात आलेली मुंबईतील रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली असून, गेल्या 15 दिवसांत 17,372 रुग्णांची भर पडली आहे; तर 526 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई ः नियंत्रणात आलेली मुंबईतील रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली असून, गेल्या 15 दिवसांत 17,372 रुग्णांची भर पडली आहे; तर 526 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधीही 93 दिवसांवरून 80 दिवसांवर आला आहे. अनलॉकसह गणेशोत्सवाच्या खरेदीनिमित्त नागरिक घराबाहेर पडल्याने रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसते. यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. 

मिरा-भाईंदरकरांना कर माफी नाहीच ; आयुक्तांची भुमिका ठरली महत्त्वाची - 

मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिका आरोग्य विभागाला यश येत आहे; परंतु अनलॉक सुरू झाल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाला चिंता सतावत आहे. मुंबईत 1 सप्टेंबरपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लाख 46 हजार 947 वर पोहोचली आहे; तर 7690 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 26 ऑगस्टला कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 93 दिवसांवर पोहोचला होता. तर 28 ऑगस्टला आकडा घसरत 86 दिवसांवर येऊन पोहोचला. 1 सप्टेंबरला तर 80 दिवसांवर आला. 

दरम्यान, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आजही 81 टक्‍क्‍यांवर आले आहे. गेल्या 15 दिवसांत मुंबईतील रुग्णसंख्येत वाढ दोत असल्याचे दिसते. 17 ऑगस्टला मुंबईतील रुग्णसंख्या 1,29,479; तर मृतांचा आकडा 7170 इतका होता. रुग्ण दुपटीचा दर 86 दिवसांवर तर रुग्ण बरे होण्याचा दर 80 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला होता. 

मेट्रो 3 च्या विधान भवन स्थानकाचे बांधकाम पूर्ण; 'कट आणि कव्हर' या आधुनिक पद्धतीचे बांधकाम

मुंबईसह राज्यभरातील लॉकडाऊन शिथिल होत असून, अनलॉक सुरू झाले आहे. यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. सरकारने वेळोवेळी घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करणे महत्त्वाचे असून, नागरिकांनी तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे, गर्दीत जाणे टाळणे गरजेचे आहे. 
- डॉ. अविनाश भोंडवे,
अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र 

 

रुग्णवाढीवर दृष्टिक्षेप 
तारीख                 रुग्ण                   मृत्यू 
17 ऑगस्ट           753                    40 
18 ऑगस्ट           931                    49 
19 ऑगस्ट           1132                   46 
20 ऑगस्ट           1275                   46 
21 ऑगस्ट           1406                   42 
22 ऑगस्ट           1134                   32 
23 ऑगस्ट           991                    34 
24 ऑगस्ट           743                    20 
25 ऑगस्ट           587                     35 
26 ऑगस्ट         1854                    28 
27 ऑगस्ट         1350                     30 
28 ऑगस्ट          1217                   30 
29 ऑगस्ट           1432                 31 
30 ऑगस्ट          1237                   30 
31 ऑगस्ट          1179                  32 
1 सप्टेंबर            1142                   35 
एकूण                17372               526 

---------------------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An increase of 17,372 patients in 15 days; The duration of patient doubling also decreased in mumbai