मिरा-भाईंदरकरांना कर माफी नाहीच ; आयुक्तांची भुमिका ठरली महत्त्वाची 

mira-bhainder_
mira-bhainder_

भाईंदर ः कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक डबघाईला आलेल्या मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाने चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता करात 50 टक्के सवलत देण्यास नकार दिल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीवर डोळा ठेवून करसवलतीचा ठराव मंजूर करणाऱ्या भाजपला आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी दणका दिल्याची चर्चा मिरा-भाईंदरच्या राजकीय वर्तुळात होती. 

मिरा-भाईंदर शहरात कोरानाने अक्षरश: थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने पालिकेच्या सर्वच विभागांतील कर्मचारी तथा अधिकारी वर्ग मार्च महिन्यापासून कोरोनाच्या लढाईत उतरल्याने त्याची मालमत्ता कर विभागाला मात्र जबर किंमत मोजावी लागली आहे. मालमत्ता कराची देयके वितरित करण्यात कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने या महिन्यापर्यंत सर्व देयके मुख्यालयासह विभागीय कार्यालयात अक्षरश: धूळ खात पडलेली दिसून आली आहेत. 
मिरा-भाईंदर शहरात साधारणत: साडेतीन लाख मालमत्ता करधारक आहेत. यापैकी 2.5 लाख निवासी करधारक आहेत. महानगरपालिकेने या चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कराच्या माध्यमातून 271 कोटी रुपयांचे आर्थिक उत्पन्न अपेक्षित होते; मात्र देयकांचे वितरण न झाल्याने हा विभागच बंद ठेवण्यात आला होता. 

येथील नागरिकांची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने या नागरिकांना दिलासा देण्यासाठी भाजपने मालमत्ता करात थेट 50 टक्के इतकी सवलत या चालू आर्थिक वर्षाकरिता देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्‍टोबरपर्यंत मालमत्ता कराची देयके अदा करणाऱ्यांना या करसवलतीचा लाभ मिळेल, असा ठरावही भाजपने बहुमताच्या जोरावर महापालिका सभागृहात मंजूर केला आहे. 
कोरोनामुळे मालमत्ता कराची ऑनलाईन वसुली केवळ दीड कोटी इतकीच झाली आहे; मात्र आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी भाजपच्या या ठरावाला रेड सिग्नल दाखवला असून हा ठराव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. 


मुंबई शहरात 550 चौरस फूट क्षेत्रफळाच्या सदनिकांपर्यंत मालमत्ता कर माफ करण्यात आला आहे. त्यामुळे आयुक्त डॉ. राठोड यांना या ठरावाची अंमलबजावणी करायची नसेल तर त्यांनी हा ठराव व्यपगत करण्यासाठी शासनाकडे पाठवावा. शासनाकडून या ठरावाला मान्यता देण्यात येईल. 
- नरेंद्र मेहता, माजी आमदार 
 

* या आर्थिक वर्षात मिरा-भाईंदरकरांवर कोरोनाचे संकट आलेले आहे. या संकटाशी धैर्याने सामना करताना जनतेला आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागले आहे. त्यामुळे मिरा-भाईंदरमधील मालमत्ता करधारकांना सरसकट या एका वर्षासाठी मालमत्ता कराची माफी द्यावी, प्रशासनाने यासंदर्भात आडमुठेपणाचे धोरण अंगीकारल्यास यासाठी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागावी लागेल. 
-                             प्रभाकर म्हात्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख 

कोरोनामुळे मालमत्ता करवसुली संथगतीने सुरू झालेली असली, तरी अपेक्षित उत्पन्नाऐवजी 70 ते 75 टक्के महसूल या आर्थिक वर्षअखेरपर्यंत वसूल होऊ शकतो. या पार्श्‍वभूमीवर या करात 50 टक्के इतकी सवलत देण्याची क्षमता प्रशासनामध्ये नाही; मात्र सवलत 20 टक्केपर्यंतच दिली जाऊ शकते, परंतु भाजपने आपली ताठर भूमिका कायम केल्यास हा ठरावा राज्य शासनाकडे यथोगत करण्यासाठी पाठवावा लागेल. 
                                    डॉ. विजय राठोड, आयुक्त, मिरा-                                                        भाईंदर महानगरपालिका 

 

mira bhayander Municipal Commissioner refuses to grant property tax relief?amp

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com