आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण; पाहा किती घसरला...

आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण; पाहा किती घसरला...
आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण; पाहा किती घसरला...

नवी मुंबई : घाऊक बाजारात जुन्या कांद्याची आवक बंद झाली असून, नवीन कांद्याची आवक वाढली आहे. सद्यस्थितीत दररोज नवीन कांद्याच्या ९० ते १०० गाड्या बाजारात दाखल होत आहेत. या कांद्याची गुणवत्ता पूर्वीच्या तुलनेत बऱ्यापैकी चांगली आहे. त्यामुळे आता बाजारात कांद्याची टंचाई जाणवत नाही. परिणामी कांद्याचे ६० रुपयांपासून ८० रुपये किलोपर्यंत दर खाली आले आहेत. लसूण, बटाटा दरातही घसरण झाली आहे.

जूनपासून कांद्याच्या दरात वाढ होत होती. १५ ते २० रुपये किलोपासून सुरू झालेला हा दरवाढीचा प्रवास १३० रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचला होता. त्यामुळे किरकोळ बाजारात एक किलो कांद्यासाठी १६० रुपये मोजावे लागत होते. सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यातून कांद्याने पाणी आणले होते. मात्र, आता राज्यासह गुजरातमधून कांद्याची आवक होत असून, परदेशातील म्हणजेच तुर्कीमधूनही कांदा बाजारात येत आहे. हा कांदा नवीन असला तरी ओला नाही. आता बऱ्यापैकी वाळलेला कांदा बाजारात येत आहे. त्यामुळे बाजारात महिनाभरापूर्वी निर्माण झालेली कांद्याची टंचाई आता कमी झाली असून, दरही कमी होऊ लागले आहेत. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत नवीन कांदा ८० ते १०० रुपये किलो होता. जुना कांदा ११० ते १३० रुपये किलो होता. यात जुना कांदा बाजारात येणे बंदच झाले आहे. त्यामुळे जुन्या कांद्याचा बाजार आवरला आहे. आता नवीन कांदा पाहायला मिळत आहे. या कांद्याचे दर ६० ते ८० रुपये किलो आहेत. त्याचबरोबर बटाट्याच्या दराने घेतलेली उसळीही खाली आली आहे. तर लसणाच्या दरातही घसरण झालेली पाहायला मिळत आहे. 

लसूण, बटाट्याचीही घसरगुंडी
लसणाच्या दरातही घसरण झालेली पाहायला मिळते. आतापर्यंत लसणाचे दर घाऊक बाजारात १०० ते १५० रुपये किलो झाले होते. चांगला लसूण २००  रुपये किलोपर्यंतही गेला होता. आता हे दर ९० ते १२० रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. त्याचबरोबर बटाट्याच्या दराने घेतलेली उसळीही खाली आली आहे. २५ ते ३० रुपये किलोपर्यंत गेलेला बटाटा १३ ते २५ रुपये किलोपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे मालालाही बऱ्यापैकी उठाव मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com