मुंबईत पक्ष्यांच्या मृत्यूच्या तक्रारीत वाढ, एक हजारांहून अधिक तक्रारी प्राप्त

मिलिंद तांबे
Friday, 22 January 2021

मुंबईत पक्ष्यांच्या मृत्यूच्या तक्रारी वाढल्या असून पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे शहरातील विविध भागातून 1 हजार 795 तक्रारी दाखल झाल्या आहेत.

मुंबई: मुंबईत पक्ष्यांच्या मृत्यूच्या तक्रारी वाढल्या असून पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे शहरातील विविध भागातून 1 हजार 795 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यात कावळे, कबुतरांचा समावेश असून कोंबडी मृत झाल्याची तक्रार नाही.

राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव झाल्यापासून लोकं खूप सतर्क झाली आहेत. एखादा पक्षी मृत झाल्याचे आढळल्यास त्याची माहिती पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली जात आहे. गेल्या दोन आठवड्यांत पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे पक्ष्यांच्या मृत्यूच्या 1795 तक्रारी आल्या आहेत. या तक्रारी कावळे, कबूतर आणि इतर पक्ष्यांचा मृत्यू झाल्याच्या आहेत.

'बर्ड फ्लू'चा प्रसार झाल्यापासून प्रशासन सतर्क झाले आहे. पालिकेने 6 जानेवारी आणि 8 जानेवारीला काही मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठवले. आतापर्यंत त्यातील 2 नमुने सकारात्मक आले आहेत. स्थलांतरित पक्षांमुळे हे कावळे बाधित झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र मुंबईत पोल्ट्री फार्म नसल्याने चिंता करण्याची गरज नसल्याचे ही पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

राज्यात 'बर्ड फ्लू'चा प्रसार झाल्यापासून लोकं सावध झाली आहे. मृत पक्षांची माहिती देणारे फोन कॉल वाढले असले तरी अनेक फोन कॉल एकाच मृत्यूचा पक्षांबाबत असतात असे ही निदर्शनास आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे प्रत्यक्ष पक्षांच्या मृत्यूचे प्रमाण कमी असून तक्रारींचे प्रमाण जास्त असल्याचे ही त्यांनी सांगितले. तर राज्यात 6 हजारांहून अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भायखळा प्राणीसंग्रहालय प्रशासन सतर्क आहे. सध्या प्राणीसंग्रहालयात 200 पेक्षा जास्त पक्षी आहेत.  खबरदारी म्हणून भायखळा प्राणीसंग्रहालयात स्थलांतरित पक्ष्यांचे आणि इतर पक्ष्यांचे पिंजरे वेगळे ठेवण्यात आले आहेत. सध्या प्राणी संग्रहालयात बर्ड फ्लूची कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळली नाहीत असे प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ संजय त्रिपाठी यांनी सांगितले.

हेही वाचा- म्हणून राज ठाकरेंनी लिहिलं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना पत्र 

पालिका प्रत्येक तक्रारीची दखल घेत आहे. मृत पक्षांबाबत तक्रारी अधिक दिसत असल्या तरी मुंबईला बर्ड फ्लू चा धोका नाही. सरकारने घालून दिलेले निर्देशांचं पालन करण्यात येत असून लोकांनी चिंता न करता योग्य ती खबरदारी घ्यावी.
प्रविणा मोराजकर, अध्यक्ष, आरोग्य समिती

------------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Increase bird death complaints Mumbai receiving more than thousand complaints


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase bird death complaints Mumbai receiving more than thousand complaints