esakal | चिंताजनक : नवी मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संक्रमणात वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

positive.

शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोनाबाधितांचा आकडा आज 395 वर पोहचला. दिवसभरात सापडलेल्या 46 नव्या रुग्णांमध्ये आधीपासून कोरोनाबधित असणाऱ्या विविध कुटुंबांतील 30 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

चिंताजनक : नवी मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संक्रमणात वाढ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोनाबाधितांचा आकडा आज 395 वर पोहचला. दिवसभरात सापडलेल्या 46 नव्या रुग्णांमध्ये आधीपासून कोरोनाबधित असणाऱ्या विविध कुटुंबांतील 30 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. ऐरोलीतील एका गर्भवती महिलेची प्रसूती झाल्यानंतर तिच्या नवजात बालकालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. तर दिघ्यातील रामनगरमध्ये राहणाऱ्या व्यक्तीचा ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा सातपर्यंत गेला आहे. 

मोठी बातमी : लवकरच येऊ शकते गोड बातमी ! १०० युनिटपर्यंत वीज मोफत? मंत्री नितीन राऊत यांचं मोठं वक्तव्य..

नवी मुंबईत सापडलेल्या रुग्णांपैकी नेरूळ 14, वाशी आणि कोपरखैरणे 7, तुर्भे 5, घणसोली 8, ऐरोली 4 आणि दिघा 2 असे एकूण 46 नवे कोरोनाबधित रुग्ण सापडले. मुंबईतील रे रोड येथे कोरोनाबाधित किराणा दुकान मालकापासून त्यांच्या घरातील पाच सदस्यांना संसर्ग झाला आहे. मुंबईतील महानंदा डेअरीत काम करणाऱ्या एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. नेरूळ जुईनगर सेक्टर 24 येथील मृत व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे एकाच कुटुंबातील सहा जण कोरोनाबाधित झाले आहेत. एपीएमसी मार्केटमधील दाणा मार्केटमध्ये अकाऊंटचे काम करणाऱ्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या कुटुंबातील चार व्यक्तींनाही लागण झाली आहे. दिवसभरात पालिकेच्या हाती आलेल्या अहवालात कोरोनाबाधित रुग्णांपासून त्यांच्या संपर्कात असलेले नातेवाईक आणि मित्रांना लागण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

नक्की वाचा : कोरोनावरील लस 'फास्टट्रॅक'मध्ये बनवा ! कोरोना लस निर्मितीत भारताची मजल कुठवर?

दिघ्यातील रामनगर येथे वास्तव्यास असणारे आणि ग्रँट रोड येथे संगणक ऑपरेटर असणाऱ्या एका व्यक्तीला आधीपासून मधुमेहाचा त्रास असल्याने खासगी रुग्णालयात भरती केले होते. परंतु, त्यांचा त्रास अधिक वाढल्याने त्यांना 4 मे रोजी ठाण्यातील जिल्हा रुग्णालयात भरती केले असता 5 मे रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर आलेल्या अहवालात मृत व्यक्ती कोरोनाबाधित आल्याचे निष्पन्न झाले. या मृत्यूमुळे नवी मुंबईतील मृतांचा आकडा सातवर गेला आहे.

Increase in corona infections in Navi Mumbai day by day